उन्हाळ्याची सुट्टी; बालनाट्यांशी गट्टी (व्हिडिओ)

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) - ‘हिमगौरी आणि सात बुटके’ या बालनाट्यातील या छोट्या कलावंताने तिसरी घंटा मनापासून वाजवली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) - ‘हिमगौरी आणि सात बुटके’ या बालनाट्यातील या छोट्या कलावंताने तिसरी घंटा मनापासून वाजवली.

पुणे - कुणाला रंगमंचावरील चेटकिणीची जादू बघायची असते, तर कुणाला राक्षसाला हरविणारा राजपुत्र हवाहवासा वाटत असतो. मोर, चिमणी, लांडगा, हत्ती, माकड यांसारख्या पक्षी व प्राण्यांचे जगही अनेकांना अनुभवायचे असते. राजा, राणी, राजकन्या, परी, सात बुटके आदींच्या गोष्टी डोळ्यांसमोर साकार होत असल्याची मौज लुटण्यासाठी बाळगोपाळ आता नाट्यगृहांत जमू लागले आहेत.

यंदाही उन्हाळ्याची सुट्टी लागल्याबरोबर नाट्यवेड्या बालप्रेक्षकांची पावले रंगमंदिरांच्या दिशेने वळू लागली आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व सांगवीतील नाट्यगृहांमध्ये बालनाट्यांची धमाल मस्ती सुरू झाली आहे.

बालनाट्यांचा आनंद घेण्यासाठी बाळगोपाळांची लगबग सुरू आहे. काही बालनाट्ये वर्षानुवर्षे सादर केली जात असूनही त्यांची गोडी कायम आहे. काही नवीन बालनाट्ये बालप्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी नवे विषय घेऊन येताना दिसतात, तर काही पर्यावरण संरक्षण, वाहतुकीचे नियम पाळा, मोबाईलचा अतिवापर टाळा, मैदानी खेळ खेळा, भरपूर वाचा, यांसारखे संदेश देत आहेत.

निखळ मनोरंजन करणारे प्रसंग, प्रभावी कथानक, रंजक भाषा, ताल धरायला लावणारे संगीत आदी कलागुण असलेली बालनाट्ये दाद मिळवीत आहेत. दर्जेदार बालचित्रपट पाहणारा बालप्रेक्षकवर्ग बालनाट्यांबाबत चोखंदळ होत आहे. कार्टून फिल्म, मालिका पाहणाऱ्या बालप्रेक्षकांना आकर्षित करणे, हे बालरंगभूमीवर निर्मिती करणाऱ्या जुन्या व नव्या रंगकर्मींसाठी आव्हान ठरत असल्याने त्यांचा कस लागल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com