गुंजवणी धरणापुढील `बंद नलिका सिंचन प्रकल्प` लागला मार्गी

गुंजवणी धरणापुढील `बंद नलिका सिंचन प्रकल्प` लागला मार्गी

सासवड - जिल्ह्यातील भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्‍यांतील 21, 392 हेक्टर शेतीच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी.. वेल्हे येथील गुंजवणी धरणावरुन `बंद नलिका सिंचन प्रकल्प` तांत्रिकदृष्ट्याही मार्गी लागला आहे. 1,016  कोटींच्या खर्चाची आज ई-निविदा प्रसिध्द झाली. त्यामुळे सासवड येथे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यालयापुढे व गावोगावी कार्यकर्ते व शेतकऱयांनी जल्लोश केला आहे. 

गुंजवणी धरण मौजे धानेप (ता.वेल्हे) येथे कानंदी नदीवर 3.69 टिएमसी क्षमतेचे कित्येक वर्षे अडले होते. मात्र श्री. शिवतारे यांच्या प्रयत्नाने 13 वर्षांच्या खंडानंतर ते नुकतेच बांधून पूर्ण झाले. नंतरही प्रकल्पग्रस्तांनी अडथळे आणले. शिवतारेंनी प्रकल्पग्रस्तांच्या, तसेच जलसंपदा व महसूल अधिकाऱ्यांच्या समवेत वारंवार बैठका घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न लक्षणीय मार्गी लावले. पुढे धरणाचे काम वर्षाच्या आत सांडव्यासहीत पुर्ण झाले. दरम्यान राष्ट्रीय हरीत लवादापुढील लढाईनंतर धरणाचे गेट बंद करुन 3.69 टीएमसी पाणीसाठा अखेर साठला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने व राज्यमंत्री शिवतारेंच्या पाठपुराव्याने प्रकल्पाच्या `बंद नलीका` कामासाठी सुप्रमानुसार मंजुरी दिली. आता बंद नलीका कामाची निविदा प्रक्रीया आज सुरु झाली आहे. त्याबाबत आज ई-निवादा प्रसिध्द झाली व राज्यमंत्री शिवतारे समर्थकांनी सासवड कार्यालयापुढे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. एक मोठा प्रकल्प दृष्टीपथात आल्याने काही गावांत शेतकऱयांनीही आनंद व्यक्त केला. आज सकाळ पासून सोशल मिडीयाने हा विषय व्यापून टाकला. आज ता. 6 सासवड (ता. पुरंदर) येथील शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे तालुका प्रमुख व जि.प. सदस्य दिलीप यादव यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची या विषयावर बैठक होऊन आनंद व्यक्त करण्यात आला. श्री. यादव म्हणाले. गुंजवणी प्रकल्पातील धरण पूर्ण करणे, त्यातील भूसंपादन - मोबदला - आंदोलने व न्यायालयीन लढाईचे अडथळे पार करणे, जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाच्या शेकडो अटींची पूर्तता करणे, नविन सुप्रमानुसार मंजुरी मिळविणे, आर्थिक तरतूद, राज्यपालांची मोहोर व जलविद्युत प्रकल्पाच्या नावाखाली प्रकल्पात आणलेले अडथळे दूर करणे.. आदी कसरत पार करीत राज्यमंत्री शिवतारे यांनी मेहनत घेत, निविदा प्रक्रियेत हा प्रकल्प आणला. ही मोठी कामगिरी असून आता प्रक्रीया पूर्ण होताच काम सुरु होईल. पुरंदरसह तिन्ही तालुक्यांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. 

जनतेच्या विश्वासाने मला पाठपुराव्याचे बळ - शिवतारे राज्यमंत्री शिवतारे म्हणाले., अनेक वर्षांपासून शेतकरी गुंजवणीच्या पाण्याची वाट पाहत आहे. मला त्यातील सारे अडथळे पार करीत धरण पूर्ण करुन दृष्टीपथात प्रकल्प आणता आला.. याचे श्रेय जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला जाते. ज्यांनी या कामांत अडथळे आणण्याचे पाप केले.. त्यांचा लवकरच पुराव्यासह पर्दाफाश करणार आहे. कामाचे नियोजन 24 ते 30 महिन्यांचे असले तरी आम्ही 48 महिन्यांची अंतिम मुदत दिली आहे. अद्ययावत सुविधांमुळे हा प्रकल्प मुदतीआधीच पूर्ण झालेला दिसेल. शेतकरी खुश होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com