ravet
ravet

पुण्यात भरधाव कंटेनर पुलावरुन नदीपात्रात कोसळला

पिंपरी चिंचवड : मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथील पुलावरून भरधाव कंटेनर नदीपात्रात कोसळला.आज सकाळी ही घटना घडली. सुमारे ४० फुट उंचीवरून पडल्यामुळे कंटेनरच्या केबीनचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत चालक मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.

देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पूलावरील बघ्यांची गर्दी हटविताना पोलीसांना बरीच कसरत करावी लागली. कंटेनर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पवना नदीवरील समांतर पुलाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेतून खाली पडला. कंटेनरसोबत चालक रमेश विठ्ठल बुधावंत खाली पडला. मात्र नदीपात्रातील पाण्यामुळे किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर देहूरोड येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com