किलबिल किलबिल... 

किलबिल किलबिल... 

मांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध पाणवठ्यांबरोबरच कवडीपाट येथेही वैविध्यपूर्ण पक्षी दिसू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रशिया व तिबेटमधून आलेले रंगीबेरंगी बदक, तर मध्य आशियातून आलेले शेकाटे व इतर पाणपक्ष्यांचा समावेश आहे. 

हौशी पक्षिनिरीक्षकांना गेली अनेक वर्षांपासून हे ठिकाण खुणावत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसरपासून सहा किलोमीटर अंतरावर कवडीपाट पक्षिनिरीक्षण केंद्र आहे. निसर्गयात्री संस्थेचे संचालक व पक्षी अभ्यासक विशाल तोरडे म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपासून पक्षी अभ्यास व त्यांच्या अधिवासांचे रक्षण करत आहोत. अधिवासांच्या  संवर्धनासाठी प्रयत्न करतो’’

बदलणारे वातावरण, पाणी प्रदूषण यामुळे पक्ष्यांचे हे आश्रयस्थान असुरक्षित झाले आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे या पक्षिवैभवाला धोका निर्माण झाला आहे, असे हौशी पक्षिनिरीक्षक रोहित पोमण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com