शिक्षण समितीचा प्रस्ताव ऑगस्टमध्ये - सौरभ राव

Saurabah-Rao
Saurabah-Rao

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणार असून ऑगस्टमधील सर्वसाधारण सभेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करणार आहे, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिली. 

शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यावर राज्य सरकारने २६ जून २०१४ रोजी राजपत्र काढले. त्यानुसार महापालिकेने सर्वसाधारण सभेमार्फत शिक्षण हक्क समिती स्थापन करावी, असे म्हटले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव सादर करून सुमारे दीड वर्षे झाली आहेत. परंतु, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून याबाबत चालढकल होत आहे, असे मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते हेमंत संभूस तसेच गणेश सातपुते, अनिल राणे, संतोष पाटील, विनिता ताटके, योगेश खैरे, विशाल शिंदे, संतोष पाटील, महेश शिंदे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणले. शिक्षण समिती स्थापन न झाल्यामुळे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाचे खासगीकरण होत आहे, असाही आरोप शिष्टमंडळाने केला. आयुक्तांनी याबाबत सोमवारी घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालयात बैठक घेतली. तेथे मनसेचे शिष्टमंडळ त्यांना पुन्हा भेटले. त्या वेळी आयुक्तांनी पुढच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे 
स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com