दिवाळीसाठी एसटीकडून जादा बस 

दिवाळीसाठी एसटीकडून जादा बस 

पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या मार्गावर चारशेपेक्षा अधिक जादा बस सोडण्यात येत आहे. 

एसटीच्या शिवाजीनगर, पुणे रेल्वेस्थानक, स्वारगेट बसस्थानकासह खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मैदान येथून या बस सोडण्यात येत आहेत. या स्थानकातून रोज दोनशे ते अडीचशे जादा बस सोडण्यात येतील, अशी माहिती एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाइन पद्धतीन हे आरक्षण करता येत आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या लागून आलेल्या सुट्यांमुळे शनिवारी सर्व बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. 

येथून सुटतात जादा बस 
- शिवाजीनगर बसस्थानक : नियमित सुटणाऱ्या बस व्यतिरिक्त औरंगाबाद, नगर आणि नाशिकसाठी जास्त बस 
- स्वारगेट बसस्थानक : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बारामती, भोर आदी. 
- पिंपरी-चिंचवड बसस्थानक : नियमित सुटणाऱ्या बसव्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, लातूर आदी. 
- खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड बसस्थानक : नागपूर, अकोला, अमरावती, अहमदपूर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, तुळजापूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा आदी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com