Deepak-Mhaisekar
Deepak-Mhaisekar

‘उंच इमारतींच्या बांधकामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा’

पुणे - पुणे महानगर क्षेत्रातील ७० मीटरपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामांचे परिपूर्ण प्रस्ताव आवश्‍यक सर्व कागदपत्रांसह पुणे महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

हाय राइज कमिटीचे पुनर्गठन करण्यात आले असून, या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला नगर प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर, पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विकास विभागाचे मुख्य वास्तुविशारद संजय गेडाम, पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. व्ही. आर गुणाले, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्ट्रक्‍चरल अभियंता, तांत्रिक तज्ज्ञ, नगररचना विभागाचे अधिकारी, बांधकाम व्यवसायायिक उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, उंच इमारतींच्या परवानगीबाबत बांधकाम व्यावसायिकांनी सादर केलेल्या प्रस्तावातील कागदपत्र तपासण्यासाठी एक उपसमिती निर्माण केली आहे. या उपसमितीने प्रस्तावात सर्व नियमांची पूर्तता झाल्याची खात्री करूनच हाय राइज कमिटीकडे अहवाल सादर करावा. समितीच्या पुढील बैठका साधारणपणे दर दोन महिन्यांनी आयोजित कराव्यात. बैठकीमध्ये पुणे महानगर क्षेत्रातील ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या चार बांधकाम प्रस्तावांच्या मंजुरीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com