इनक्‍युबेशन सेंटरची आज पायाभरणी

Incubator
Incubator

बारामती - शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी नीती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन सेंटरची पायाभरणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. १७) सकाळी नऊला होणार आहे.

या सेंटरच्या उभारणीने बारामती कृषी महाविद्यालय आता शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे उद्योगामध्ये रूपांतरित करणारे जागतिक दर्जाचे केंद्र बनणार आहे. भारतातील नव्या ७२ सेंटरपैकी बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय हे एकमेव शेतीशी निगडित केंद्र आहे. या इनोव्हेशन व इनक्‍युबेशन सेंटरसाठी नीती आयोगामार्फत केंद्र सरकार मदत करणार आहे. केंद्रामार्फत जे नवसंशोधन होणार आहे, त्याला पाठबळ देण्यासाठी टाटा ट्रस्टचा देखील सक्रिय सहभाग राहणार आहे.  ही इमारत लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून नवनिर्मितीच्या संशोधनासाठी नव्या पिढीतील विद्यार्थी, नवसंशोधकांना मोठे पाठबळ मिळणार आहे. इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी, बायर कंपनीच्या सीएसआर विभागाचे प्रमुख सुहास जोशी, टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार बर्जिस तारापोरवाला, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व संस्थेचे विश्‍वस्त या वेळी उपस्थित राहणार आहेत.

बायर कंपनीबरोबर होणार करार
औषधनिर्मिती क्षेत्रातील बायर कंपनीने शेती क्षेत्रातील संशोधनाला हातभार लावणाऱ्या व औषधी वनस्पती उत्पादकांमधील युवा नवउद्योजकांना शिष्यवृत्ती व आर्थिक सहकार्य देण्याचे घोषित केले आहे. यासंदर्भात बायर कंपनी व बारामती कृषी महाविद्यालय यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार होणार आहे. सरकारबरोबर खासगी कंपन्यांची नवसंशोधनाला दिली गेलेली जोड हे देखील भारतात पहिल्यांदाच घडत असून, यातून शाश्‍वत शेतीचे नवे मॉडेल भारताला उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com