इंदापूरातील चारशे हेक्टर जमिन होणार राखीव वने

इंदापूरातील चारशे हेक्टर जमिन होणार राखीव वने

कळस : इंदापूर तालुक्यातील सुमारे चारशे हेक्टर क्षेत्र संरक्षित वन जमिन म्हणून घोषित करण्यात येणार आहे. सरकारी मालकीच्या या जमिनीवरील  अतिक्रमणांची माहिती व चौकशी सुरू आहे. तालुक्यातील सुमारे १७ गावांचा यामध्ये समावेश असून, हे क्षेत्र संरक्षित वन म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया युध्द पातळीवर सुरू असल्याची माहिती वन जमाबंदी अधिकारी सुभाष बोरकर यांनी दिली.

कळस (ता. इंदापूर) येथील बिरंगुडीतील गटाच्या चौकशीसाठी बोरकर आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपरिमंडल अधिकारी अशोक नरुटे, वनरक्षक निखील गुंड, मंडल अधिकारी जयश्री कवडे, तलाठी बंडगर, सरपंच गणेश सांगळे, बबनराव खारतोडे आदी उपस्थित होते.  

ते म्हणाले, राज्यातील पुणे, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी जमिनीच्या चौकशीचे काम सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील १७ गावांचा यामध्ये समावेश आहे. शासनाच्या या पड जमिनीवरील अतिक्रमधारकांच्या हरकती व हक्क सादर करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. शिवाय या जमिनीवरील पूर्वीपासून अस्तीत्वात असलेले रस्ते, पायवाटा, मंदिरे, सार्वजनिक पाणी टाकी या बाबी वगळता इतर अतिक्रमणे काढून, त्या जमिनी वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या जमिनींना राखीव वने घोषित करुन भविष्यात तेथे वृक्षलागवड करण्यात येईल.

तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले, शासनाने गावागावातील काही जमिनीचे गट वन कायद्यानुसार राखीव वने घोषित करण्याच्या प्रक्रियेस सुरवात केली आहे. यानुसार लोकांच्या हरकती व अधिकाऱ्यांकडून चौकशीचे काम संबंधित ग्रामपंचायतींना आगाऊ सूचना देऊन पार पाडण्यात आले आहे. यामुळे वैयक्तीक हक्क व संबंध सांगणाऱ्यांनी सबळ पुरावे सादर करणे गरजेचे आहे. हे पुरावे स्वतः उपस्थित राहून अथवा निवेदनाद्वारेही सादर करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com