नाटक बुडण्याची वेळ येऊ नये - राज ठाकरे

नाटक बुडण्याची वेळ येऊ नये - राज ठाकरे

पुणे - जी गोष्ट घरात बसून दिसते, चित्रपटांमधून पाहायला मिळते, ती सोडून आता नाटक करावे लागेल, याचा मराठी नाट्यनिर्मात्यांनी गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्‍यक आहे. आपले मराठी नाटकही बुडाले, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे सांगितले. 

‘थर्ड बेल एन्टरटेन्मेंट’तर्फे ‘कलातीर्थ निर्मिती पुरस्कार’ ठाकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे, ‘थर्ड बेल एन्टरटेन्मेंट’चे स्वप्नील रास्ते, अतुल केळकर, सोनिया कोनशेट्टी या वेळी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, ‘‘आता नाटक थोडे बदलणे गरजेचे आहे. जुन्या गोष्टी आता प्रेक्षकांवर लादू शकत नाही. ‘सोशल मीडिया’, इतर मनोरंजनाची माध्यमे आहेत, जगाच्या पाठीवर घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना घरबसल्या दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रेक्षक मराठी नाटक बघायला नाट्यगृहात जाईल, तेव्हा तो त्या नाटकाकडून आता जास्त अपेक्षा करेल, किंबहुना तो करतो आहे. दुर्दैवाने अनेक मराठी नाटके आता चालत नाहीत. आता काळ बदलला आहे. दूरचित्रवाणीवर पाहू शकत नाही, ते पाहायला मिळेल, असे नाटक आले तरच प्रेक्षक आता नाटकांकडे वळेल.’’ ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ‘मोहन वाघ निर्मिती गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अरुण काकडे, सुनील बर्वे, प्रसाद कांबळी, संदेश भट, शुभांगी दामले, ऋषीकेश देशपांडे, सुनील फरतडे, शशांक सोळंकी, अशोक हंडे, सागरिका दास यांना ‘कलातीर्थ’ पुरस्काराने गौरविण्यात आले. निवेदिका मंजिरी जोशी आणि संदीप पंचवाडकर यांना ‘भाऊ मराठे पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. विजय पोवार, आश्‍लेषा येसूगडे, कविता कोपरकर, श्रुती कुलकर्णी यांनाही या वेळी गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com