खेड : बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जखमी

khed.
khed.

खेड - तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बुरसेवाडी येथे गुरुवारी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्या घरच्या बाहेरील पढवित झोपलेल्या भागूबाई खंडू पारधी या 65 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या तोंडाला, गळ्याला व मानेला गंभीर जखमा झाल्या. वेळीच आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला गावातील नागरिकांनी भागूबाई यांना वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुण्यात नेण्यचा सल्ला दिला.

घटनेची माहिती मिळताच बिबी वनविभागाचे वनपाल एन डी विधाते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. वनविभागाच्यावतीने महिलेला औशोधोपचारासाठी तातडीने 2000 रु मदत देऊन पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवले.

या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची पहिलीच घटना घडली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com