लातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार

logo.jpg
logo.jpg

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांना ऊस भूषण पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारांचे वितरण 15 डिसेंबरला वार्षिक सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

व्हीएसआयच्या वतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार, आर्थिक व्यवस्थापन भूषण अशा पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांची घोषणा व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी व्हीएसआयचे कृषी व तंत्रज्ञान विभागाचे संचालक विकास देशमुख, मुख्य अभियंता के. आर. पाटील, आर. व्ही. दाणी, जे. एम. मोहंती यावेळी उपस्थित होते.

यंदाचा स्व. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. प्रशस्तीपत्र आणि रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जुन्नर तालुक्यातील विघ्नहर साखर कारखान्याला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार कडेगाव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला प्राप्त झाला आहे. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार पुण्यातील दौंड शुगर कारखान्याला मिळाला आहे. 

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार-  
दक्षिण विभाग - छ्त्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल जिल्हा कोल्हापूर,  
मध्य विभाग - नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, रेडणी ता. इंदापूर.
उत्तरपूर्व विभाग -  रेणा सहकारी साखर कारखाना, निवाडा, ता. रेणापूर जि. लातूर.  

 उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार -
क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कुंडल, जि. सांगली आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर माढा जि. सोलापूर.

विभागीय ऊस भूषण पुरस्कार -
दक्षिण विभाग- शोभा धनाजी चव्हाण, पलूस, मोहन धर्मा चकोते, दत्तात्रय चव्हाण ता. कडेगाव
मध्य विभाग- शिवाजी गजेंद्र पाटील नेवरे ता. माळशिरस,  प्रकाश बाळासाहेब ढोरे वडगाव ता. मावळ,  तानाजी पवार लवंग ता. माळशिरस.
उत्तर पूर्व विभाग- वैशालीताई विलासराव देशमुख बाभळगाव, जि. लातूर आणि रविकिरण भोसले खामसवाडी जि. उस्मानाबाद.

राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार-
चवगोंडा अण्णा पाटील दानोळी, ता. शिरोळ कोल्हापूर, सौरभ विनय कुमार कोकीळ कोरेगाव, सातारा आणि मारुती ज्ञानु शिंदे वाठार ता. हातकणंगले जि.कोल्हापूर.

विभागीय तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार-
दक्षिण विभाग-
(प्रथम) उदगिरी सुगर अँड पॉवर बामणी खानापूर,
(द्वितीय) कुंभी कासारी साखर कारखाना कुडित्रे ता. करवीर जि.कोल्हापूर,  
(तृतीय) क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखाना कुंडल जि. सांगली
मध्य विभाग-
(प्रथम) श्री अंबालिका शुगर अंबिका नगर जि. नगर,
(द्वितीय) अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले, नगर,
(तृतीय) सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज ता. माळशिरस
उत्तर पूर्व विभाग-
(प्रथम) विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना लातूर.
द्वितीय) विलास सहकारी साखर कारखाना, निवळी लातूर आणि
(तृतीय) बारामती अॅग्रो ता. कन्नड औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com