दौंडमध्ये एटीएम अपहारप्रकरणी एकाला अटक

A man arrested for ATM Fraud in Daund
A man arrested for ATM Fraud in Daund

दौंड ( पुणे) : दौंड शहरात एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली ७ लाख ९३ हजार रूपयांची रोकड आणि संगणक साहित्य असा एकूण ९ लाख ९३ हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात बापू जरांडे या आरोपीस अटक केली असून दुसरा फरारी झाला आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी आज (ता. २०) याबाबत माहिती दिली. शहरातील दौंड-गोपाळवाडी रस्त्यावर स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये टाटा कम्युनिकेशन्सचे इंडिकॅश नावाचे एकाच ठिकाणी दोन एटीएम आहेत. सदर एटीएममध्ये रोकड भरण्याचे कंत्राट रायटर सेफगार्ड लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून, त्या कंपनीचे कर्मचारी बापू किसन जरांडे (वय २६ , रा. पारवडी, ता. बारामती) व लखन जीवन सरवैय्या (रा. रेल्वे वसाहत, पॅावर हाऊस जवळ, दौंड) हे रोकड भरण्याचे आणि एटीएम देखभालीचे काम पाहतात.

11 सप्टेंबर रोजी रात्री १० ते ११ दरम्यान बापू जरांडे व लखन सरवैय्या यांनी दोन एटीएममधील ७ लाख ९३ हजार रूपयांची रोकड व दोन लाख रूपये किमतीचे कोअर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा एकूण ९ लाख ९३ हजार ३०० रूपयांच्या एेवजाचा संगनमताने अपहार केला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांनी दोन्ही एटीएमचे कोअर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटदेखील चोरून नेले. चोरीनंतर एटीएम बंद पडल्याने व सर्व्हरशी संपर्क तुटल्यानंतर कंपनीला या चोरीची माहिती मिळाली.

१४ सप्टेंबरला चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर टाटा कम्युनिकेशन्सचे अधिकारी दीपक जोतवाणी यांनी दौंड पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी रात्री उशीरा फिर्याद दाखल केली. 

दौंडचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रकाश खरात व गजानन जाधव यांच्यासह पोलिस पथकातील धनंजय दाभाडे, सागर गायकवाड, महेश पवार व आसिफ शेख यांनी संयुक्तपणे तपास करीत याप्रकरणी बापू जरांडे या आरोपीस अटक केली. दुसरा आरोपी लखन सरवैय्या फरार झाला आहे. 

स्थानिक न्यायालयाने आरोपी बापू जरांडे यास २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती फौजदार प्रकाश खरात यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com