म्हाडाच्या घरांची लॉटरी पुढच्या आठवड्यात

पिंपरीगाव - म्हाडाकडून पिंपरी गाव परिसरात म्हाडाचे काम सुरू आहे.
पिंपरीगाव - म्हाडाकडून पिंपरी गाव परिसरात म्हाडाचे काम सुरू आहे.

पिंपरी - तुम्ही जर पिंपरी-चिंचवड परिसरात घर घेण्याचा विचार करत असाल तर म्हाडाच्या माध्यमातून ही संधी मिळणार आहे. म्हाडाच्या नियोजित लॉटरीमध्ये चार हजार ६६४ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, त्यामध्ये दोन हजार सातशे घरे शहर परिसरातील आहेत. पुढील आठवड्यात ही लॉटरी काढण्यात येणार आहे.

म्हाडाने पिंपरी वाघिरेमध्ये मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे बांधली आहेत, त्याचा या लॉटरीमध्ये समावेश आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून म्हाडाकडे येणारी सर्वसमावेशक २० टक्‍के घरे आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरेही नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. 

पिंपरी वाघिरेमध्ये म्हाडा ३.८८ हेक्‍टर जागेमध्ये मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी एकूण ९३५ घरे बांधत आहे. २२ मजल्यांच्या या इमारती असून तेथे टू बीएचके आणि थ्री बीएचकेचे फ्लॅट बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पाची सुरवात जानेवारी २०१७ मध्ये झाली असून आतापर्यंत ६० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. 

खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून म्हाडाकडे आलेल्या २० टक्‍के घरांची संख्या ५०० च्या पुढे आहे. प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना यासाठी अर्ज करता येणार असून ही घरे वाकड, रहाटणी, वडमुखवाडी, चिखली, पुनावळे, रावेत, देहू या भागात आहेत. बहुतेक फ्लॅट वन बीएचकेचे राहणार असून, त्यासाठी १५ ते २० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये तळेगावमध्ये ६३८ आणि चाकणमधील म्हाळुंगे भागात ६४८ घरे आहेत.

म्हाडाच्या लॉटरीची प्रक्रिया पुढल्या आठवड्याच्या अखेरीस सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस ही लॉटरी काढण्यात येणार आहे. नागरिकांना त्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे. 
- अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा 

म्हाडाची घरे 
    पिंपरी-वाघिरेमध्ये मध्यम उत्पन्न गटांसाठी घरे - ५९५ 
    फ्लॅटचे क्षेत्र - दोन बीएचके 
    प्रस्तावित किंमत - ५५ लाख रुपयांच्या पुढे 
    उच्च उत्पन्न गट - ३४०
    फ्लॅटचे क्षेत्र - तीन बीएचके 
    प्रस्तावित किंमत - ७४ लाख रुपयांच्या पुढे    
    हस्तांतरित झालेली २० टक्‍के घरे
    फ्लॅटचे क्षेत्र - वन बीएचके 
    प्रस्तावित किंमत - १५ ते २० लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com