उरूळी कांचन येथील खूनाचा उलगडा

उरूळी कांचन येथील खूनाचा उलगडा

उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील बापु रामा केसकर (वय 48) या इसमाच्या खूनाचा उलगडा करण्यात ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला चोवीस तासाच्या आत यश आले असून, बापु केसकर यांच्याकडून होत असलेल्या वारंवार अनैसर्गिक कृत्याला कंटाळून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका अल्पवयीन मुलाने बापूचा गळा चिरुन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या अल्पवयीन मुलासह, त्याला मदत करणाऱा मित्र बाळासाहेब आंबेकर (रा.उरुळी कांचन) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलासह दोघांनीही बापु केसकर याचा खून केल्याची कबुली दिली असुन, दोघांनाही लोणी काळभोर पोलिसांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव मुळ येथील फॉरेस्टमधील पडक्या शेतात, रविवारी (ता. 16) गळा चिरलेल्या अवस्थेत  बापु केसकर याचा मृतदेह आढळुन आला. मात्र मृतदेहाजवळ आरोपींनी कसलाही पुरावा न ठेवल्याने, बापुचा खून कोणी व का याबद्दल पोलिस यंत्रना बुचकळ्यात पडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी लोणी काळभोर पोलिस व स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. यात बापू केसकर यास लैंगिक दुर्बलता होती व तो त्याच्याच ओळखीतील एका अल्पवयीन मुलास वारंवार फोन करुन अनैसर्गिक संभोगासाठी बोलावुन घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिस शिपाई धिरज जाधव, विजय कांचन व सचिन गायकवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दयानंद गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक माहिती घेतली असता, गुन्हा घडलेच्या दोन दिवस शुक्रवारी (ता. 14) संध्याकाळी आठ वाजनेच्या सुमारास बापुचे व संबधित अल्पवयीन मुलाचे फोनवरुन सभाषन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे संबधित अल्पवयीन मुलाकडे अधिक चौकशी केली असता, वरील प्रकार उघडकीस आला. 

याबाबत अधिक माहिती देताना दयानंद गावडे म्हणाले, उरुळी कांचन परीसरातील एका बांधकामावर बिगारी म्हणुन काम करताना या प्रकरणातील अल्पवयीन मुलगा व बापु केसकर या दोघांची ओळख झाली होती. बापू केसकर यास लैंगिक दुर्बलता असल्याने, बापु नेहमी संबधित मुलाकडे अनैसगिक संभोगासाठी आग्रह धरायचा. मात्र अल्पवयीन मुलाने नकार दिल्यास. बिगारी काम देतो असे सांगत त्याच्याकडे सारखं-सारखे अनैसर्गिक संभोगाची मागणी करत होता. बापुच्या या सततच्या वागण्याला अल्पवयीन मुलगा वैतागला होता. यातुन अल्पवयीन मुलाने बापु केसकरला शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजनेच्या सुमारास फॉरेस्टमधील पडक्या शेतात बोलावुन खुन केला. व त्यानंतर खुनासाठी वापरलेला चाकु बाळासाहेब आंबेकर याच्याकडे ठेऊन दोघेही निर्धास्तद झाले होते. मात्र पोलिसांच्या तपासामुळे दोघांनाही चोवीस आत ताब्यात घेण्यात यश मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com