किनारपट्टीवरील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर राष्ट्रीय पातळीवरील परिषद

khadakwasla
khadakwasla

खडकवासला : केंद्रीय जल आयोग व खडकवासला येथील केंद्रिय जल विद्युत संशोधन केंद्रात किनारपट्टीवरील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यावरील बुधवारी 26 सप्टेंबर पासून दोन दिवसाचे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष सय्यद मसुद यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे.

केंद्रीय जल संसाधन मंत्रालय, नदी विकास आणि गंगा पुनरुत्पादन खात्याच्या वतीने परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत देशातील शंभराहून अधिक शास्त्रज्ञांसह अभियंते सहभागी होणार आहेत. समुद्र किनारा तसेच तटीय प्रदेशात सुनामी , पुर अशा नैसर्गिक आपत्तीनां तोंड देण्यासाठी आधुनिक पध्दतीने मांडणी ,व्यवस्थापन यावर चर्चा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त सचिव टी. राजेश्वरी, जगमोहन गुप्ता, ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शिपिंग ऑफ मिनिस्ट्रीचे वरिष्ठ अधिकारी, विविध पोर्ट ट्रस्ट आणि इंडियन पोर्ट असोसिएशन आणि केंद्र  व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.  वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधक शोध प्रकल्प सादर करणार आहेत. असे परिषदेचे आयोजक व  खडकवासला  केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ टी. नागेंद्र व महेंद्र पवार यांनी सांगितले. 

कॉर्पोरेट अभियांत्रिकी आणि पोर्ट डेव्हलपमेंटच्या डिझाइन, नियोजन, बांधकाम, देखभाल आणि संशोधन पैलूमध्ये काम करणारे अभियंते , शास्त्रज्ञांना एकत्र आणून  त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करणे , व्याख्यान, पेपर सादरीकरण, पॅनेल चर्चा, प्रदर्शनातून  अभियांत्रिकी आणि पोर्ट डेव्हलपमेंटच्या सर्व पैलूंचा समावेश करुन हा सोशल, टेक्नॉलॉजीकल आणि गव्हर्नन्स फील्ड्सवर परिषदेत मांडणी केली जाणार आहे. 

लिटलॉर चक्रीवादळ, सुनामी, समुद्र पातळी वाढ, तटीय भागात ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाचा प्रभाव, पर्यावरणापासून तसेच मनोरंजन आणि पर्यटन इत्यादिंमधील किनारपट्टी संरक्षण आणि संरक्षणासंदर्भातील नैसर्गिक आपत्तींची कमतरता आहे. यावर परिषदेत महत्त्वाची चर्चा होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com