पुणे - मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधातील उच्च न्यायालयात याचिकेबाबत येत्या दोन ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बाजू मांडणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
शहरातील मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्यांना मोफत पार्किंग पुरविण्याची सूचना महापालिकेने व्यवस्थापनाला केली होती. त्यानंतर पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल आणि मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाला नोटिसाही बजाविल्या होत्या. त्यामुळे काही दिवस लोकांना मोफत पार्किंग मिळाले.
परंतु या निर्णयाला विरोध करीत, मॉल आणि मल्टिप्लेक्स व्यवस्थापनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर दोनदा सुनावणी झाली. दरम्यान पार्किंग शुल्क घेणाऱ्यांना कायदेशीर नोटिसा देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. यासंदर्भात बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली, पण निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता पुन्हा येत्या 2 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
|