शहराची आवश्‍यक माहिती एका "क्‍लिक'वर 

शहराची आवश्‍यक माहिती एका "क्‍लिक'वर 

पिंपरी - महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यांचे संदेश, परिपत्रक, निवेदन आदी स्वरुपाची सर्व माहिती नागरिकांना आता एका क्‍लिकवर मिळणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या "पिंपरी-चिंचवड वन' या "मोबाईल ऍप'चे अनावरण महापौर राहुल जाधव आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते बुधवारी झाले. ""असे ऍप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे,'' असे आयुक्तांनी सांगितले. 

राज्य सरकारमार्फत 2018 मध्ये राष्ट्रीय पातळीवर नाविन्यपूर्ण व स्टार्टअप उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत नविन उद्योजकांना व्यवसायाच्या संधी प्राप्त करून दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फेही सहायभूत धोरण राबविले जात आहे. त्याअंतर्गत महापालिकेने "पिंपरी चिंचवड- वन' या नावाने "मोबाईल ऍप' कार्यन्वित केले आहे. त्याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले, ""नागरिकांना माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन आदी स्वरुपाची माहिती एकाच ऍपद्वारे सहज उपलब्ध होईल. त्याद्वारे नागरिक थेट महापालिकेच्या संपर्कात राहतील. सदरचे मोबाईल ऍप सीएमएस प्लॅटफॉमद्वारे तयार करणेत आलेले आहे. नागरिकांना माहिती देणे व ती उपलब्ध करणे, हे सुशासनासाठी उपयुक्त आहे. स्टार्टअप व राष्ट्रीय विकासासाठी ऍपचा हातभार लागणार आहे.'' 

काय आहे ऍपमध्ये 
"पिंपरी चिंचवड-वन' ऍपद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी शहरांची संपूर्ण माहिती, चित्रफित, संदेश, छायाचित्र तातडीची माहिती शोधता येईल. "ऍप'मध्ये विषयानुसार स्वतंत्र भाग आहेत. नवे अपडेट त्या भागांमध्ये विषयनिहाय समाविष्ट केले जातील. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गतची माहिती गुरुवारपासून ऍपवर 
उपलब्ध होईल. स्टार्टअप संकल्पनेअंतर्गत वर्क ऍपस्‌ या संस्थेने "पिंपरी चिंचवड ऍप' तयार केले आहे. 

राज्य सरकारतर्फे नाविन्यपूर्ण सोसायटी महाराष्ट्र स्टार्टअप वीक स्पर्धेत आयोजित "वर्क ऍपस्‌' संस्था विजयी झालेली आहे. या वेळी नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण आम्ही केले होते. या संकल्पना राज्य सरकारबरोबर राबविण्यात येत आहेत. 
- रुद्रजीत देसाई, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्क ऍपस्‌ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com