शेतकऱ्यांना माफक दरात सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा

शेतकऱ्यांना माफक दरात सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा

उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा खर्च वाचेल. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणच्या मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.बुंदेले यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे केले. 

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना उष्ण कटिबंदीय देशात विशेषतः आपल्या देशात सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा खुप प्रभावीपणे वापर होऊ शकतो यातूनच राज्यातील अवर्षणग्रस्त शेतकरी व भारनियमनग्रस्त शेतकरी यांचेकरीता मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबवण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार मिळणार असल्याचेही बुंदेले यांनी यावेळी स्पष्ठ केले.   

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेबाबत उरुळी कांचन व परीसरातील शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी महावितरणच्या वतीने उरुळी कांचन येथे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकार व शेतकरी प्रतिनीधी यांच्याशी बोलतांना बुंदेले यांनी वरील आवाहन केले. यावेळी बुदेंले यांच्यासमवेत उरुळी कांचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

यावेळी सौर कृषिपंप योजनेबद्दल अधिक माहिती देताना बुंदेले म्हणाले, चालु वर्षी राज्यभर दुष्काळाचे सावट असल्याने पारंपारिक उर्जा उत्पादनावर मर्यादा येत आहेत. याचा परिणाम शेतीला पुरवठा होत असलेल्या विजेप्रवाहावर होत आहे. शेतीसाठी दिवसातुन केवळ आठच तास विज उपलब्ध होणार असल्याने, पाणी असूनही शेतीतील उभ्या पिकाला वेळेवर पाणी पुरवणे अवघड होते आहे  अशावेळी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजने अंतर्गत सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अविरत पाणी उपसा शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना केवळ मुळ किमतीच्या १५ टक्के रक्कम भरावयाची आहे. यामध्ये पंप सेटसह सर्व सोलर उपकरणे उपलब्ध करुन दिली आहेत. नुकतीच यामध्येही कपात करुन शेतकऱ्यांना ३ एच पी पंपासाठी फक्त रु. १६ हजार ६०० तर ५ एच पी पंपासाठी रु.२४ हजार ६०० इतकीच किंमत भरावी लागणार आहे. ज्यांची नविन जोडणीसाठी प्रतिक्षा यादीत नावे प्रलंबित आहेत त्यांना प्राधान्य क्रमाने यात लाभ मिळणार आहे. 

या योजनेची अमलबजावणी जबाबदारी महावितरण कंपनीवर सोपवली आहे. याचा उपयोग विहिर नदी शेततळे कालवा तसेच कुपनलिकेवर करता येणार आहे. या योजनेनुसार राज्य शासनाने एक लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट जाहिर केले आहे. या सौर कृषीपंपासोबत दोन एल ई डी बल्ब व एक मोबाईल चार्जर यासाठी एक बॅटरी मिळणार आहे.   

बुंदेले पुढे म्हणाले, या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी शेतीचा ७/१२ उतारा, आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र (लाभार्थी अनुसूचीत जाती जमाती असेल तर) तसेच संपर्काचा पत्ता पाण्याच्या खोलीची माहिती माहिती देणे आवश्यक आहे. हा अर्ज महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरावा लागणार आहे. या योजनेबद्दल अधिक माहिती अधिक हवी असल्यास, शेतकऱ्यांनी जवळच्या विज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन बुंदले यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com