देशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री

देशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला. पूर्वीच्या कारभाऱ्यांनी वीस वर्षांत जी कामे केली नाहीत; तीच कामे भाजप सरकारने चार वर्षांत मार्गी लावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शाश्‍वत विकासाच्या अनेक योजनांमुळे पुणे शहर भारतातील पहिल्या क्रमांकाचे शहर असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार संजय काकडे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विजय काळे, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. म्हाळुंगे- माण येथे हायटेक सिटीची उभारणी करण्यात येत आहे. या सिटीमुळे आणखी सुमारे दोन लाख तरुणांना रोजगार मिळू शकेल. यामुळे पुणे हे बेरोजगारांना रोजगार, बेघरांना हक्काचे घर, दळणवळणाचे उत्तम प्रकल्प आणि शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा देणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनणार आहे. अशी अपेक्षाही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली.  

ते म्हणाले, ‘‘पुणे शहराच्या शाश्‍वत विकासासाठी मेट्रो, रिंग रोड, इलेक्‍ट्रिकल बस, परवडणारी घरे, पुणे शहरासाठी चोवीस तास पाणी, नदी सुधार योजना, शहरातील अंतर्गत रस्ते, कचरा व्यवस्थापन आदींसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यापैकी काही प्रकल्प हे जुनेच आहेत; पण ते केवळ कागदावर होते. त्यांना प्रत्यक्षात आणण्याचे काम भाजपने केले आहे.’’ 

दिलीप कांबळे, संजय काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून शिरोळे यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com