बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावू : मुख्यमंत्री

junnar.jpg
junnar.jpg

जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरिश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, विघ्नहर व लेण्याद्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, गोविंद मेहेर, सरपंच अस्मिता कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ''दाऱ्याघाटाच्या कामाबाबत सरकार प्रयत्नशील असून त्यामुळे मुंबईचे अंतर साठ किलोमीटरने कमी होणार आहे. घाटाचा ८० टक्के भाग ठाणे जिल्ह्यात तर २० टक्के पुणे जिल्हयात असल्याने ठाणे जिल्ह्यच्या बाजूने सर्वेक्षणाला प्राधान्य देणार आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आंबेगव्हाण येथे ५०० हेक्टर क्षेत्रावर बिबट्या सफारीच्या माध्यमातून वन व वन्यप्राणीसंवर्धन यासारख्या बहुउद्देशीय प्रकल्पाच्या उभारणीसाठी जुन्नर तालुका पर्यटन समितीच्या माध्यमातून आराखडा तयार करण्यात येईल.  दुष्काळ निवारणाच्या दृष्टीने बुडीत बंधांऱ्यांबाबत शासनाने धोरण तयार असून त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल. नागरिकांनी विमानतळाबाबतचे गैरसमज दूर करावेत. त्यासाठी आता निवडण्यात आलेली जागा योग्य असल्याने त्याच ठिकाणी विमानतळ करून पूर्वनियोजीत जागेवर भविष्यात वेगळ्या प्रकल्पाची उभारणी करता येईल.
 

गेली साडेचार वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली तसेच ऊस, कांदा, दुध यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देऊन सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरचे अनेक गुन्हे सरकारने मागे घेतले असून उर्वरित गुन्ह्यांबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते मागे घेण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले. त्यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पत्रकार उदय निरगुडकर यांचे भाषण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com