पुण्यात 'आयटी' कंपन्यांमध्ये मनसेच्या आंदोलनाची अफवा

 पुण्यात 'आयटी' कंपन्यांमध्ये मनसेच्या आंदोलनाची अफवा

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये मंगळवारी (ता. 22) दुपारी 12 ते 5 या वेळेत आंदोलन करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर आहे. परंतु ही अफवा असल्याचे समोर आले आहे. 

अशा प्रकारचे कुठलेही आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नसल्याचे स्पष्टीकरण मनसेचे प्रदेश सचिव हर्षल देशपांडे यांनी ई-सकाळशी बोलताना दिले आहे.

दरम्यान, मनसे आंदोलन करणार असल्याच्या अफवेने आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यासमोर नक्की कशाबद्दल आंदोलन होणार आहे आणि त्यादिवशीची काय परिस्थिती असणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, परंतु हर्षल देशपांडे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याने सर्वांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com