हिंमत असेल, तर मैदानात या - सदाभाऊ खोत

हिंमत असेल, तर मैदानात या - सदाभाऊ खोत

पुणे - "अशा घोषणा काय देता, तुमच्यात हिंमत असेल, तर मैदानात या. मला बोलवा, मैदान ठरवा, तारीख सांगा, सदाभाऊ तेथे एकटा यायला तयार आहे,' असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना बुधवारी (ता. 10) दिले. 

पंतप्रधान पीकविमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी खोत यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली. खोत यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, पंतप्रधान पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला. 

खोत म्हणाले, ""अशा घोषणा देणाऱ्यांचे शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही. प्रसिद्धी कशी मिळेल एवढी यांच्या डोक्‍यात हवा शिरलेली आहे. तुमची जागा आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दाखवून दिलेली आहे. त्यामुळे ही मस्ती सदाभाऊ आणि कार्यकर्ते चालू देणार नाहीत. तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहात, हे लोकशाहीत जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे अशा घोषणा देऊन आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करीत असाल, तर ते होऊ देणार नाही.'' 

राजू शेट्टी यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. तरीही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या भ्रष्टाचाराची "सीबीआय' चौकशी करण्यात यावी. अन्यथा आम्ही शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करू. 
- पूजा जोळे, कार्यकर्ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com