मालधक्क्यासाठी सत्याग्रह आंदोलन

मालधक्क्यासाठी सत्याग्रह आंदोलन

पुणे -  रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकालगत असलेला मालधक्का बंद करण्याच्या भूमिकेविरुद्ध महात्मा गांधी जयंतीपासून सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय हमाल पंचायतीने घेतला आहे. पुणे स्टेशन परिसरात सुरू असलेली कामे या सत्याग्रहात बंद पाडली जातील, असा इशारा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला. 

कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने मालधक्का बंद केला आहे. या मालधक्‍क्‍यावर मालगाड्या आणणे बंद केल्याने दीड हजार हमाल, ३० हुंडेकरी, दोनशे ट्रकचालक यांचा रोजगार बंद झाला आहे, असा आरोप आढाव यांनी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी पंचायतीचे उपाध्यक्ष सुबराव बनसोडे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सुहास शिंदे आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी मालधक्का बंद केल्यानंतर डिसेंबर महिन्यात धरणे आंदोलन केले होते. त्या वेळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी मालधक्का बंद करण्यात येणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. हा मालधक्का पूर्ण क्षमतेने चालू न देता, फुरसुंगी, खडकी, घोरपडी आदी ठिकाणी माल उतरविण्याची भूमिका रेल्वे प्रशासन घेत असल्याचा आरोप आढाव यांनी केला. या विरोधात गांधी जयंतीपासून सत्याग्रह केला जाणार आहे. शहरातील खासदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती आढाव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com