अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार

crime
crime

लोणी काळभोर (पुणे) : मोबाईलवर गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन देण्याच्या बहाण्याने कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथील एका चार वर्षीय अल्पवयीन मुलावर एका परप्रांतीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (ता. 23) रात्री उशीरा उघडकीस आली आहे. अमरिश उर्फ साजन दास हे त्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय युवकाचे नाव असून, गुन्हा दाखल होण्यापुर्वीच तो फरार झाला आहे. मात्र अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी अमरिशचा भावाला लोणी काळभोर पोलिसांच्या हवाली केले आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाक वस्ती हद्दीत एका इमारतीत अल्पवयीन मुलगा व त्याचे कुटुंबीय रहातात. तर त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अमरिश व त्याचा भाऊ भाड्याच्या खोलीत रहातात. शनिवारी (ता. 22) सकाळी दहाच्या सुमारास अल्पवयीन मुलाला मोबाईलवर गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन देतो असे आमिष दाखवुन, अमरीश याने आपल्या खोलीत नेले. व त्या ठिकाणी त्याच्या लैंगिक अत्याचार केले. तासाभरानंतर संबधित मुलगा खाली आला असता, संबधित मुलाने अमरिश याने केलेल्या कृत्याची माहिती दिली. यावर संबधित मुलाच्या आईने आपल्या नातेवाईकांच्यासह अमरिशच्या घरात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पवयीन मुलाची आई जाब विचारत असताना, अमरिश याने सर्वांना चकवा देत पळ काढला. मात्र अल्पवयीन मुलाला होणारा त्रास पाहुन, संबधित मुलाच्या नातेवाईकांना मुलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान संबधित अल्पवयीन मुलाबाबत घडलेल्या घटनेची माहिती रविवारी (ता. 23) रात्री लोणीस्टेशन परीसरातील कांही स्वयमसेवी संस्थाच्या कार्यकर्त्याना समजली. त्यांनी अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन माहिती घेतली. व त्यांनी ही बाब तात्काळ लोणी काळभोर पोलिसांना कळवली. तसेच अमरिश दासच्या भावाला पकडुन पोलिसांच्या हवाली केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com