grampanchayat
grampanchayat

वाघोली : सरपंच, ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस

वाघोली : केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या कामकाजात गंभीर अनियमितता आढळून आल्याने तीन तत्कालीन सरपंच, दोन तत्कालीन ग्रामसेवक व विद्यमान ग्रामसेवक, सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे. सचिन धुमाळ यांनी जिल्हा परिषदेकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीचा अवहाल प्राप्त झाल्यावर ही कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली.

तत्कालीन सरपंच हिरामण हरगुडे, दिपाली हरगुडे, सुजाता सावंत यांच्यासह विद्यमान सरपंच मीनाक्षी सातव, तत्कालीन ग्रामसेवक एस एम गायकवाड, आर आर दवणे, विद्यमान ग्रामसेवक पी डी वेताळ याना ही नोटीस बजविण्यात आली खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.     

नोंदवह्या न ठेवणे, नळ जोड नाकारणे, नियमबाह्य ठराव घेणे, मासिक सभेतील ठराव, ई - निविदा संदर्भात कार्यवाही न करणे आदी बाबी चौकशीत समोर आल्या आहेत. एकाच ठेकेदारावर ग्रामपंचायत मेहेरबान असल्याचे तसेच काही खर्च कोठे व कधी केला याबाबत काहीच नोंदी नसल्याचे दिसून आले आहे. पुरंदर पंचायत समितीचे विस्तार तथा चौकशी अधिकारी एस के कुंभार यांनी चौकशी करून हा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com