लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या निरीक्षकपदी सूरज बंडगर

लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या निरीक्षकपदी सूरज बंडगर

लोणी काळभोर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या सतरा अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक म्हणून यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडू बंडगर यांची तर शिरूरचे पोलिस निरीक्षक म्हणून नारायण मोहन सारंगकार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमिवर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक यांच्यासह पोलिस खात्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या अठ्ठावीस फेब्रुवारी पूर्वी करणे अपेक्षित होते. त्यनुसा संदीप पाटील यांनी सतरा पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. 

पोलिस निरीक्षकाचे नाव व कंसात सध्याचे पोलिस स्टेशन ते नियुक्तीचे पोलिस स्टेशन
सूरज बंडू बंडगर (यवत ते लोणी काळभोर), दिपक बबनराव लुकडे (सोलापूर ग्रामीण ते लोणावळा ग्रामीण), सुधाकर भीमराव कोरे (सोलापूर ग्रामीण ते जिल्हा विशेष शाखा), युवराज मारुती मोहिते (सांगली ते सुरक्षा शाखा पुणे ग्रामीण), प्रवीण विठ्ठल खाणापुरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र तूरची, सांगली ते जिल्हा विशेष शाखा पारपत्र विभाग), नारायण मोहन सारंगकर (सातारा ते शिरूर), औदुंबर भालचंद्र पाटील (कोल्हापूर ते बारामती शहर), आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (सातारा ते सासवड) भाऊसाहेब नारायण पाटील (सातारा ते यवत) राजू धोंडीराम मोरे (जिल्हा विशेष शाखा पुणे ग्रामीण ते भोर) दगडू सायप्पा हाके (वडगाव मावळ ते लोणीकंद), सुरेश विठ्ठल निंबाळकर (पौंड ते वडगाव मावळ), विठ्ठल दिगंबर दबडे (बारामती शहर ते कामशेत) अशोक विश्वासराव धुमाळ (बारामती शहर ते पौंड ), गणेश रंगनाथ उगले (जिल्हा विशेष शाखा पारपत्र विभाग ते लोणी काळभोर गुन्हे शाखा), प्रताप विठोबा मानकर (लोणीकंद ते सुरक्षा शाखा, ते पोलिस कल्याण शाखा), कृष्णदेव कल्पना खराडे (कल्याण शाखा ते मंचर पोलिस स्टेशन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com