टाकळी ढोकेश्वर - गोरेश्वर 100 कोटींचा टप्पा पार करणार

bajirao-panmand
bajirao-panmand

टाकळी ढोकेश्वर - संस्थेच्या कोअर बँकेच्या माध्यमातून 11 शाखा संगणकीकृत असुन आरटीजीएस,एसएमएस,वीज भरणा यासंह अन्य आधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत संस्था लवकरच 100 कोटी ठेवींचा आकडा पार करेल असा विश्वास गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद यांनी व्यक्त केला.

गोरेगाव (ता.पारनेर) येथील गोरेश्वर पतसंस्थेची 22 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.संस्थेकडे 70 कोटींच्या ठेवी असुन 40 कोटींचे कर्जवाटप केले आहे ठेवीत सातत्याने वाढ होत आहे सभासदांना 13 टक्के लाभांश देण्याची घोषणा यावेळी पानमंद यांनी केली.

संस्थेने 'अ' ऑडीट वर्ग कायम ठेवला आहे.यावेळी विविध परिक्षा व स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना दाम दुप्पट रकमेच्या पावतीसह गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. निवृत्त सरकारी कर्मचारी व माजी सैनिकांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष पोपट नांगरे, अंबादास नरसाळे, दत्तात्रय नरसाळे, अरूण पानमंद, शिवाजी नरसाळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com