मंदिराचा सभामंडप कोसळून तीन ठार; चार जखमी 

tempal.jpg
tempal.jpg

पिंपरी (पुणे) : बांधकाम सुरू असलेल्या महादेव मंदिराचा दगडी सभामंडप कोसळून झालेल्या अपघातामध्ये तीन जण ठार झाले. तर चौघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी पिंपळे गुरव परिसरामध्ये घडली

चिदंम्मा मनसोप्पा पुजारी (वय ३०, गोपी चाळ, खडकी) आणि मनतोष संजीत दास (वय २९, रा. पश्चिम बंगाल) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत तर तिसऱ्याचे नाव समजू शकले नाहीत. कमलेश कांबळे (वय १७, विशाल नगर, पिंपळे निलख), आयप्पा मलप्पा तंबडू (वय ३५, रा. पिंपळे निलख), धनंजय चंदू धोत्रे   (वय २४ रा. बीड) योगेश मच्छिंद्र मासाळकर (वय २०, रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी जखमींची नावे आहे. कमलेश आणि आयप्पा वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या दोन जखमींची नावे आहेत. तर उर्वरित दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या महादेव मंदिराचे बांधकाम सुरू होते. बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मंदिराच्या सभामंडपाचा भाग कोसळला. यावेळी कामगार दगडांखाली अडकून जखमी झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बचाव पथक घटनास्थळी झाले. यावेळी ढिगाऱ्या खाली अडकलेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोन जणांचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. तर एका महिलेचा औंध रुग्णालयात मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com