दारूबंदीमुळे नाणेघाटात सहकुटुंब पर्यटनाचा आनंद

दारूबंदीमुळे नाणेघाटात सहकुटुंब पर्यटनाचा आनंद

जुन्नर : नाणेघाटात आकारण्यात येत असलेल्या उपद्रव शूल्काचा विनियोग येथील परिसर स्वच्छ ठेवण्यास होत असलेला पाहून वनविभाग व घाटघर ग्रामस्थाचे पर्यटकांनी आभार मानले. 

येथील परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या तसेच धांगडधिंगा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ग्रामस्थांनी ठरविल्याने येथे आज रविवारी (ता.२१) सहकुटुंब पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले.

जुन्नर वनविभाग व पोलीस यांच्या गस्तीपथकांनी  जागोजागी गाड्यांची झडती घेत असल्याने मद्यपान व धांगडधिंगा करणाऱ्यांनी नाणेघाटाकडे पाठ फिरविली. पर्यटकांनी दोन्ही विभागांना कौतुकाची थाप दिली आहे. 


नाणेघाटात पर्यटकांकडून वृक्षारोपण.
पिंपरी चिंचवड येथील टाटा मोटर्स मधील 19 जणांनी आज नाणेघाटात वृक्षारोपण केले. ''पर्यटकांसाठी हा प्रेरणादायी उपक्रम ठरेल. प्रत्येक पर्यटनस्थळ आपण एक पर्यटक म्हणून जपणं गरजेचे आहे. यासाठी लागते स्वयंशिस्त अंगिकृत करणे गरजेचे आहे,'' असेही त्यांनी या वेळी सांगितले 

"नाणेघाट म्हणजे मराठी मायबोलीच जन्मस्थान. आईची जेवढी सेवा, जेवढं प्रेम आपण करतो तेवढंच प्रेम नाणेघाट पावित्र्य राखण्यासाठी आपण केलं पाहिजे. हे पवित्र स्थळ अधिक सुंदर करण्यासाठी पर्यटकांच्या मदत व सहकार्याची गरज आहे".
- रमेश खरमाळे (माजी सैनिक)
         

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com