शिवाजी रस्त्याचा कोंडला श्वास; चतुर्थीमुळे दगडुशेठ मंदिर परिसरात वाहतूक कोंडी

शिवाजी रस्त्याचा कोंडला श्वास; चतुर्थीमुळे दगडुशेठ मंदिर परिसरात वाहतूक कोंडी

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी रस्त्यावर आज (ता. 24) सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नागरिकांना या वाहतूक कोंडीच्या पंचंड मनस्ताप सहन करावा लागला. आज चतुर्थी असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या रस्त्यावर आज दिवसभर वाहतूक कोंडी पहायला मिळाली.

चतुर्थी आणि रविवारची सुट्टी असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आले होते तसेच शिवाजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने रस्ता अरूंद झाला. त्यामुळे म्हणून शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. नागरिकांनी गरज नसल्यास या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्ग वापरावा. 

शनिवारवाड्यावरून निघाल्यावर तुम्ही स्वारगेटला जाण्यासाठी गुगल मॅपला सर्च केले तरी, गुगल मॅप तुम्हाला शिवाजी रस्ताने जाण्यासाठी सुचवत नाही. नियमितपणे स्वारगेटला जाण्यासाठी गूगल शिवाजी रस्त्याची सूचवला जातो मात्र, सकाळपासून या रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे गुगलनेही शिवाजी रस्त्याला पर्यायी रस्ता सुचवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com