रेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक

रेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास अटक

दौंड - पुणे ते सोलापूरदरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बक्‍श महंमद इस्माईल (वय १९, रा. गुलबर्गा, कर्नाटक) या युवकास दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १९ हजार रुपये किमतीचे साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी या बाबत माहिती दिली. ७ एप्रिल २०१८ ते २२ ऑगस्ट २०१८ दरम्यान झालेल्या चार चोऱ्यांपैकी रामस्वरूप शर्मा (वय ६८, रा. शिवपूरी, मध्य प्रदेश) हे गोवा एक्‍स्प्रेसने प्रवास करीत असताना पुणे ते दौंडदरम्यान चोरट्याने त्यांच्या पत्नीचे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरले होते. श्वेता किशोर चौधरी (वय २१, रा. बोदवड, जि. जळगाव) या महाराष्ट्र एक्‍स्प्रेसने प्रवास करीत असताना गाडी दौंड रेल्वे स्थानकावर थांबली असता चोरट्याने त्यांची ७ ग्रॅमची सोन्याची साखळी चोरली होती. टी. सुधाकर (वय ५७, रा. सिरूगुप्पा, कर्नाटक) हे बेंगळुरू-अहमदाबाद एक्‍स्प्रेसने प्रवास करीत असताना सदर एक्‍स्प्रेस दौंड रेल्वे स्थानकावर थांबली असता चोरट्याने त्यांची १० ग्रॅमची सोन्याची साखळी चोरली होती. अजय भगवान दोंदे (वय ३५, रा. वालधुनी, कल्याण) हे हुसेनसागर एक्‍स्प्रेसने प्रवास करीत असताना सदर एक्‍स्प्रेस जिंती (जि. सोलापूर) रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबली असता चोरट्याने त्यांच्याकडील ४४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी संबंधितांनी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

लोहमार्ग पोलिसांनी अल्लाह बक्‍श महंमद ईस्माईल यास एका प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने चार चोऱ्या केल्याची कबुली दिली. लोहमार्ग पोलिस पथकाने गुलबर्गा येथे त्याच्या घरावर छापा टाकून ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. सहायक फौजदार दीपक बाळेकुंद्री यांच्यासह चंद्रकांत गायकवाड, अनिल टेके, आनंद वाघमारे, संजय पाचपुते, संतोष कांबळे व सुनील गोयेकर या पोलिसांनी या कारवाईत भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com