जुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक  गंभीर जखमी

जुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक  गंभीर जखमी

ओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर धडक होऊन दोन ठार तर एक गंभीर जखमी झाले.

हा अपघात (शनिवार) सायंकाळी सातदरम्यान झाला असून संतोष दशरथ पवार (वय २०, रा. जुन्नर मार्केटयार्डजवळ) आणि कैलास बाळू साळुंके (वय. २७ ,रा. पांगरी माथा, कुमशेत, ता. जुन्नर) हे या अपघातात  ठार झाले आहे.

विकास राजाराम पारधी ( रा.भलेवाडी, डिंगोरे, ता.जुन्नर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत  ओतूर पोलिस ठाणे अंमलदार कैलास काळे म्हणाले कि कल्याणहून ओतूरकडे येत असलेली दुचाकी क्रमांक एमएच १२ ए.जी. ९२७७ हीस ओतूरकडून कल्याणकडे जाणाऱ्या पिकअप एमएच 15 बी.जे. ८५८४  ची कोळवाडी येथे कवडधारा मंदिराजवळ समोरा समोर जोरदार धडक दिली.

यात संतोष पवार हा जागीच ठार झाला तर कैलास साळुंके हा उपचारा दरम्यान मयत झाला.तर विकास पारधी गंभीर झाला आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com