भोसरीच्या अंध विद्यार्थ्यांची अष्टविनायक लेण्याद्रीला भेट

भोसरीच्या अंध विद्यार्थ्यांची अष्टविनायक लेण्याद्रीला भेट

जुन्नर: सासवड जि.पुणे श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भोसरी येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट  अंधशाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना अष्टविनायकाचे दर्शन घडविण्यात येत असून आज शनिवारी ता.22 रोजी सकाळी या मुलांनी लेण्याद्रीच्या अष्टविनायक गिरिजात्मज गणेशाचे दर्शन घेतले.

गोळेगाव ता. जुन्नर येथील गिरीजा पतसंस्थेच्या वतीने मुलांना भोजन देण्यात आले, तर बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने मुलांची राहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग साळुंके, सामाजिक कार्यकर्ता संभाजी भांगरे, वसतीगृह अधिक्षक दत्तात्रय कांबळे, लेण्याद्री देवस्थानचे विश्वस्त जयवंत डोके, काशिनाथ लोखंडे, जितेंद्र बिडवई, गिरीजा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई, दिपक कोकणे, रामचंद्र काळे, अशोक वऱ्हाडी, पांडुरंग शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सहलीचे नियोजन श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार, संजय उबाळे, जयवंत धुमाळ, रमेश फडतरे, आनंद सोनारी, व सुरेश नांगरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com