यादववाडी विद्यालयास ‘विप्रो’चा राष्ट्रीय पुरस्कार

बंगळूर - ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना यादववाडी (ता. पुरंदर) येथील शिक्षक अब्दुलगनी तांबोळी व पाच विद्यार्थिनी.
बंगळूर - ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना यादववाडी (ता. पुरंदर) येथील शिक्षक अब्दुलगनी तांबोळी व पाच विद्यार्थिनी.

परिंचे - हरगुडे ग्राम विकास संस्थेच्या यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अब्दुलगनी तांबोळी व पाच विद्यार्थिनींना सादर केलेल्या स्थानिक जैवविविधतेच्या प्रकल्पास ‘विप्रो’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या अहमदाबाद येथील पर्यावरण शिक्षण केंद्राने विप्रो कंपनीपुरस्कृत ‘विप्रो अर्थियन पर्यावरण मित्र’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतून पाणी व जैवविविधता या विषयावर प्रकल्प मागविले होते. भारतातील हजारो शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. संयोजकांच्या तज्ज्ञ समितीने यातून बारा प्रकल्पाची निवड केली. यादववाडी शाळेतील शिक्षक तांबोळी यांनी पाठविलेल्या जैवविविधता या प्रकल्पाची निवड सर्वोत्तम प्रकल्पात झाली. विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांच्या हस्ते बंगळूरमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी पुरस्काराचे संयोजक अनुराग बेहर उपस्थित होते.

‘सकाळ’ची प्रगती पुरवणी मार्गदर्शक  
प्रकल्पासाठी निसर्गमित्र पुरंदर या मंडळासह परिसरातील शेतकरी नवनाथ धोत्रे, वनपाल महादेव सस्ते, डॉ. प्रशांत ताकवले यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधनात्मक निबंधासाठी ‘सकाळ’च्या प्रगती पुरवणीचा मार्गदर्शक म्हणून उपयोग झाल्याचे विद्यार्थिनी व शिक्षक अब्दुलगनी तांबोळी यांनी सांगितले. पर्यावरण मंडळातील श्रद्धा ताकवले, सानिका ताकवले, साक्षी यादव, अंकिता बनसोडे यांनीही प्रकल्पासाठी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com