लठ्ठपणामुळे स्त्रियांमध्ये येणारे वंध्यत्व

Fat
Fat

आरोग्यमंत्र - डॉ. शशांक शहा, बेरियाट्रिक सर्जन
लठ्ठपणामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आधुनिक काळात लठ्ठपणा हा तरुण वयातच सुरू होतो. स्त्रियांना ‘पीसीओडी’, चेहऱ्यावर केस येणे, पिंपल्स येणे ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसत असतानाच स्त्रियांमधील अंडाशयाचे कार्य बिघडते. त्यामुळे लठ्ठपणावर वेळीच उपचार केले नाही, तर त्याचा थेट परिणाम वंध्यत्व येणाऱ्यावर होतो. वंध्यत्वाच्या रुग्णापुढे मोठे भावनिक आव्हान असते. त्याच्यावर बऱ्याच संप्रेरकांचे उपचार करतात. या बिघडलेल्या संप्रेरकांवर उपचार दिल्याने रुग्णाचे वजन कमी होणे अत्यंत अवघड होते. 

रुग्णाचे वजन त्याच्या सरासरी वजनापेक्षा दहा किलोंनी जास्त असल्यास नेहमीच्या, पारंपरिक पद्धतीने उपचार करणे कठीण असते. त्यामुळे अशा रुग्णावर औषधे, बलुन्स तसेच वजन जास्त असल्यास मेटॅबोलिक किंवा बेरियाट्रिक सर्जरी हा देखील त्याच्या उपचारांचा एक पर्याय असू शकतो. कारण, वयाच्या पस्तिशीपर्यंतच प्रजनन क्षमता चांगली असते. वाढत्या वयाबरोबर प्रसूतीमधील धोकेही वाढतात. प्रसूतीमधील आव्हाने वाढतात. 

इन्शुलिन रेझिसटन्स, आनुवंशिकता, संप्रेरकांमध्ये होणारा बदल आणि रुग्णाची जीवनशैली याच्या एकत्रित गणितावर लठ्ठपणा आणि प्रसूती यांचा संबंध अवलंबून असतो. कितीही ठरवले तरीही माणूस चोवीस तास जीवनशैली बदल, आहार, व्यायाम करू शकत नाही. कारण, आजच्या काळाची गरज ही त्याहून मोठी आहे. प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत.

खूप वेळेला उपचार करण्याची गरज आहे, हे लक्षात येईपर्यंत रुग्णाचे वजन २० किलोपेक्षा जास्त वाढलेले असते. अशा स्त्रियांनी मेटॅबोलिक आणि बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करून प्रसूती केल्यास त्यातील धोका कमी होतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यातून आई आणि बाळ हे दोघे सुरक्षित असतात. लठ्ठ स्त्रीला उच्च रक्तदाब, मधुमेह, सूज येणे, सिझेरियनमध्ये गुंतागुंत, जखम न भरणे, हर्निया होण्याची शक्‍यता वाढते. या गुंतागुंती टाळल्यास आईचे आणि बाळाचे आयुष्य जास्त चांगले आणि सुरक्षित होत असल्याचेही संशोधनाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे जगभरात आता या पद्धतीने उपचार करण्यावर भर दिला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com