'वाघाचे दात मोजनारेच आज वाघाचे मुके घेताय'

'वाघाचे दात मोजनारेच आज वाघाचे मुके घेताय'

येवला : शेतकरी कर्जमाफी म्हणजे मोठा घोटाळा आहे असे म्हणणारी शिवसेना आज भाजप सोबत बसली आहे. वाघाचे दात मोजून घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाघाचे मुके घेतांना दिसत आहे. स्वतःला विरोधात म्हणून घेणारी शिवसेना ही सत्तेतील भागीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'पहारेकरी चोर है' म्हणणारेच चोरांचे साथीदार झाले असल्याची स्थिती शिवसेना भाजप युतीची असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. 

भुजबळ यांच्या आज हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. आज मुखेड येथे अंगणगांव, चिचोंडी, मुखेड ते तालुका हद्द रस्ता कामाचे भुमीपूजन करण्यात, वाकद (ता.निफाड) येथे  पिण्याच्या पाण्यातचे जलकुंभ उद्धाटन, शाळेसमोर पेव्हेर ब्लॉक बसविणे कामाचे उद्घाटन, व्यायामशाळा साहीत्य पुरविणे व पर्णकुटी जवळ सभामंडप, शिरवाडे येथे ग्रामपंचायत कार्यालय, दोन सभामंडप उद्घाटन व  प्रभावतीनगर येथील अंगणवाडी इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले.

या दौऱ्यात माजी आमदार धनराज महाले, राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, अमृता पवार, अरुणमामा थोरात, जयदत्त होळकर, वसंत पवार, बाळासाहेब गुंड, भाऊसाहेब भवर, शिवाजी सुपनर, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, अरुण आहेर, प्रकाश वाघ, अनिता काळे, सचिन कळमकर, नवनाथ काळे, विश्वास आहेर, अशोक महाले, रतन काळे, विठ्ठल कांगने, संजय पगार, विश्वनाथ  सांगळे, साहेबराव आहेर, पुंडलिक होंडे, म्हसू भवर, चंद्रकांत वाघ, तुळशीराम कोकाटे, भाऊसाहेब कळसकर, अंबादास शिनगर, आदी उपस्थित होते.

देशात सैनिक शहीद होत असून जवान आणि किसान अडचणीत आले असून जवान धारातीर्थी पडत आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे.  देशातील 125 कोटी जनतेच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मात्र न बोलविता पंतप्रधान पाकिस्तानात जातात ही दुर्दैवी बाब आहे. 139 देशात जाऊन आलेल्या नरेंद्र मोदींचा एक देशही मित्र राहिला नाही का असा सवाल त्यांनी केला. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे एकही काम सरकारने केले नाही. विविध प्रश्न प्रलंबित असतांना ते सोडविण्याचे काम सरकारने केले नाही. त्यामुळे याविषयी मी आवाज उठवीत राहणार असून सरकारने कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला भुजबळ गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com