वीज कंपनीतील 6 अभियंते निलंबित

Electricity
Electricity

नाशिक - नाशिक आणि नगर महामार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याच्या कामात गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. मुंबईत मुख्यालयातून सुरू असलेल्या चौकशीत आतापर्यंत सहा अभियंते निलंबित झाले असून, आणखी 12 ते 15 अभियंत्यांवर कारवाई करण्यात असल्याचे मुंबईतील उच्चपदस्थ सूत्रांकडून समजले. नाशिक व नगर जिल्ह्यात महामार्गावरील चार विभागांशी संबंधित प्रकरणात स्थानिक प्रशासन आणि अभियंत्यांची संघटना मात्र मौनात आहे. नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान रस्त्यात येणारे विजेचे खांब हलविण्यासाठी कंपनीने चार वर्षांपूर्वी खासगी ठेकेदाराला ठेका दिला होता. प्रस्तावित कामांसाठी अपेक्षित असलेल्या खर्चापेक्षा काही पट अधिक खर्च झाला. याबाबत तक्रार करण्यात आल्याने चौकशी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com