करंजाडला बनावट मद्यसाठा पोलिसांकडून जप्त 

WhatsApp-Image-2018-11-21-a.jpg
WhatsApp-Image-2018-11-21-a.jpg

अंबासन(नाशिक) : करंजाड (ता.बागलाण) येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठया प्रमाणात विक्रीसाठी आणलेल्या बनावट विदेशी मद्यसाठ्यासह एकास मोठ्या शिताफीने अटक केली तर दोन जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ३७२०० रुपये किमतीच्या ११० बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

विंचूर-प्रकाशा महामार्गावरील करंजाड येथील बसस्थानकाजवळ आरोपी आपल्या दोन साथीदारांसह बनावट विदेशी दारू विक्रीसाठी घेऊन आल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरव यांनी पोलीस कर्मचारी गोरख गर्दे, निकेश कोळी, राजेश साळवे, जी.एल. भोये, दिलीप गवळी, भालचंद्र नेरकर आदींच्या पथकासमवेत सापळा रचून मुख्य आरोपी सागर विष्णू बोडके रा.इंदिरानगर (ता.त्र्यंबकेश्वर) यास मुद्देमालासह अटक केली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

आरोपींकडून अँटीक्यूटिक नावाच्या ३७२०० रुपये किमतीच्या लहान मोठया ११० बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान पोलीस आल्याची कुजबुज लागताच दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जी. एल. भोये व दिलीप गवळी करीत आहेत. 

आरोपी कुठून व कुणासाठी बनावट मद्य विक्रीसाठी घेऊन आले होते. याबाबत सविस्तरपणे तपास सुरू केला जात आहे. बेकायदा बनावट मद्य विक्रीद्वारे लोकांच्या जीवांशी खेळले जात असल्याने नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. 
- गणेश गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायखेडा पोलीस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com