काळ्या जादूची भीती दाखवत महिलेची 5 लाखांची फसवणूक

Five lakh cheating with woman showing fear of black magic
Five lakh cheating with woman showing fear of black magic

इंदिरानगर (नाशिक) - 'तुझ्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे. त्यामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना त्रास होत आहे', असे भासवून एका महिलेला सुमारे 5 लाख 26 हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळच्या पूर्णिया (बिहार) येथील रहिवासी आणि दिंडोरी रोड येथील शुभम कन्सट्रक्शन कंपनी च्या मार्केटिंग व्यवस्थापक शायना शाहीन (33) या श्री जी संकुल, इंदिरानगर येथे एकट्याच् राहतात. 8 सप्टेंबर रोजी त्यांना एका महिलेचा फोन आला आणि 'मैं माताजी हू, आपको कुछ तकलीफ है, हमारे पास इसका  उपाय हैं' असे सांगू लागली या महिलेने त्यांना काळी जादू, जादू टोना आदी बाबींची भीती दाखवत या पासून तुझा किंवा तुझ्या कुटुंबियांपैकी कुणाचा तरी जीव जाऊ शकतो अशी भीती मनात भरवली. यातून सुटायचे असेल तर एक पूजा करावी लागेल असे सांगत या पूजेसाठी या महिलेने सुरवातीला त्यांच्याकडून 4500 नंतर 11 हजार 500 रुपये  एचडीएफसी आणि स्टेट बँकेच्या खात्यात भरायला सांगितले. त्यानंतर या महिलेने रात्री अकरा वाजता फोन करून व्हिडीओ कॉलिंग वर आत्मा तुमच्यासमोर येईल असे सांगितले.

त्याप्रमाणे श्रीमती शाहीन यांनी हा कॉल देखील केला. एवढे सगळे झाल्यानंतर या पुढचा उपाय अजमेर येथील रफिक मौलवी करतील असे या महिलेने त्यांना सांगितले  आणि एक मोबाइल क्रमांक दिला. त्यावर संपर्क साधला असता या मौलवीने पुन्हा एकदा भूत-प्रेत, काळी जादूची भीती दाखवत त्यांना पूजा करावी लागेल असे सांगत पुन्हा एक लाख 90 हजारांची मागणी केली. त्यातील 90 हजार रुपये त्यांनी कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून उसने घेत उपरोक्त बँक खात्यांमध्ये भरले. मात्र पूर्ण पैसे भरले नाहीत म्हणून आता अजुन 1 लाख 50 हजार रुपये अजून भरा असे सांगितले. 15 सप्टेंबरला त्याने त्यांना फोन करून सांगितले की तुमचे काम झाले आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पैसे उसनवार करून सुमारे 1 लाख 59 हजार रुपये उपरोक्त बँक खात्यांत भरले.

दरम्यान या महिलेचा पुन्हा एकदा त्यांना फोन आला आणि तिने सांगितले की तुझ्या प्रकरणामुळे या मौलविचा चा मृत्यू झाला आहे .आता हे प्रकरण जर मिटवायचे असेल तर साडेसात लाख रुपये भरावे लागतील अशी तंबी दिली. भेदरलेल्या शाहीन यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांकडे उसने पैसे मागितले त्यावेळी त्यांनी एवढी मोठी रक्कम कशासाठी हवी असे विचारले असता त्यांनी हा सर्व प्रकार कथन केला. यावर त्यांची जादूटोणाची भीती दाखवून फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात ही महिला आणि संबंधित दोन अज्ञात इसमाविरुद्ध 5 लाख 26 हजार 500 रुपये इतकी फसवणूक झाल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान काळी जादू आणि जादूटोणा ची भीती दाखवून  फसवणुकीचा प्रकार सुरू झाल्याने पोलिसांनी देखील तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून लवकरच या तिघांना ताब्यात घेतले जाईल असा विश्वास वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी व्यक्त केला आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com