मिरवणुकीच्या खर्चातून वसतिगृहातील मुलांना फळांचे वाटप

wani
wani

वणी (नाशिक) : येथील वणीचा राजा बजरंग गणेशोत्सव मित्र मंडळाने पोलिसांचा बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले.

येथील कड गल्लीतील बजरंग गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक तथ उपसरपंच विलास कड यांच्या पुढाकाराने मित्र मंडळाच्या सदस्यांनी विसर्जन मिरवणूकीवर होणारा खर्च व पोलिस बांधवाचा बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी विसर्जन मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मिरवणुकीसाठी येणाऱ्या खर्चातून येथील जनता सेवा मंडळ नाशिक संचलित विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले.

फळ वाटप कार्यक्रमासाठी सरपंच सुनिता भरसट, उपसरपंच विलास कड, माजी सरपंच मधुकर भरसट, ग्रामपंचायत सदस्या शकुतंला कोकोटे, मंगला चौधरी, मनिषा जाधव, द्रोपदाबाई गांगुर्डे,  समाजसेविका मिना पठाण, नामदेव पैठणे आदी उपस्थित होते. यावेळी बजरंग मित्राच्या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते जमिर शेख यांनी माहिती देत अभिनंदन केले. वसतिगृहाचे अधिक्षक भरत भगरे यांनी मित्र मंडळाचे अध्यक्ष राहूल पवार व सदस्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com