मनमाड - काम न करता पगार घेणाऱ्या डॉक्टरची चौकशी करणारी समितीच संशयाच्या भोवऱ्यात

manmad
manmad

मनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्यास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करण्यासाठी नेमलेली चौकशी समितीच आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, चौकशी होऊनही अद्याप अहवाल दाबून ठेवल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. चौकशी करतेवेळी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा प्रशासन करत असल्याचा आरोप होत आहे.  

नवीन डॉक्टर झालेले उमेदवार डॉ मयूर पंजाबी (एम डी मेडीसीन) यांची मनमाड उपजिल्हा रुग्णालयात शासकीय सेवा देण्यासाठी मेडिकल ऑफिसर म्हणून नेमणूक झाली होती. मात्र सदर डॉक्टरने या रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता नेमणूक कार्यकालाचा पूर्ण वेतन आणि शासकीय सोयी सवलती लाटले. मात्र एकही दिवस रुग्णालयात पाय न ठेवणाऱ्या या डॉ पंजाबी याला पाठीशी घालून हजर नसतांनाही त्याला वेतन, शासकीय सोय सवलती देत फसवणुक केल्याचे दै सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे गुरू निकाळे आणि एका व्यक्तीने तक्रार अर्ज दिला होता. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही डी पाटील, मानदतज्ञ पी जी बरदापुरकर यांच्या नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने  रुग्णालयात येऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान, डॉ पंजाबी व वरिष्ठांनी त्यास पाठीशी घातल्याचे अनेक त्रुटी आढळल्याने दोषी असल्याचे पत्रकारांकडे नमूद केले होते. तसे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. मात्र चौकशी पूर्ण होऊन बराच कालावधी उलटला तरीही चौकशी अहवाल पुढे आलेला नाही. दोषींवर कारवाईही झालेली नाही. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण झाले असून, जिल्हा प्रशासनाने हा अहवाल दाबून ठेवल्याचा आरोप होत आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना का पाठीशी घातले जात आहे असाही प्रश्न आहे. त्यामुळे चौकशी करणाऱ्या चौकशी समितीच आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यातील तक्रारदार गुरू निकाळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जगदाळे यांच्याकडे तक्रारदारास देण्यात येणारी अहवालाच्या प्रतीची मागणी केली असता डॉ जगदाळे यांनी धुडकावून लावल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. आणि अहवाल दाबण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप तक्रारदार गुरू निकाळे यांनी केला आहे. 

चौकशी समितीने उपजिल्हा रुग्णालयात येऊन कागदपत्रे आणि डॉ जी एम नरवणे यांची चौकशी करून दीड महिना लोटत आला असून अद्यापही कोणताच अहवाल, निर्णय न दिल्याने चौकशी समितीवरच संशय येत आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ जगदाळे हे देखील दोषी डॉक्टरांना पाठीशी घालत आहे 
- गुरुकुमार निकाळे, तक्रारदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com