वयाचे शतक पूर्ण केलेल्या आजोबांनी १९ वेळा लोकसभेसाठी केले मतदान 

वयाचे शतक पूर्ण केलेल्या आजोबांनी १९ वेळा लोकसभेसाठी केले मतदान 

भुसावळ : सध्याची मतदानाची घटलेली टक्केवारी लक्षात घेता शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर मतदान जागृती केली जात आहे. मात्र, वयाचे शतक पूर्ण केलेल्या वामनराव पांडे यांनी आतापर्यंत न चुकता १९ वेळा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्याचा नवीन विक्रम केला आहे. या वयातही मतदानाचा हक्क बजावण्याची त्यांची धडपड मतदारांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे. 
लोकसभा निवडणुकीत बुलडाणा येथे नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. यात येथील रहिवासी वामनराव भैरव पांडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळहून पहाटे सहाला नातू डॉ. राहुल पांडे यांच्यासोबत कारने बुलडाणा गाठले. आठला बीएड कॉलेज चिखली रोड या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. भुसावळ येथील गणेश कॉलनी मधील १०१ वर्ष वयाचे आजोबा वामनराव भैरव पांडे 
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आजपर्यंत अर्थात १९५२ ते २०१९ पर्यंत १९ लोभसभा निवडणुकीत न चुकता मतदान केलेले पांडे आजोबा जुन्या काळातील मॅट्रिक उत्तीर्ण आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या होस्टेलवर वॉर्डन म्हणून सेवा देऊन निवृत्त भंडार, नागपूर, पुणे येथे सेवा दिली. बुलडाण्यात स्थाईक झालेले श्री. पांडे आता नातू डॉ. राहुल पाडे यांच्यासोबत भुसावळला वास्त्व्यास आहेत. त्यांनी आजवर एकही मतदान चुकविलेले नाही. ते १९८० ते ८५ दरम्यान अपक्ष नगरसेवकही होते. आजही ते नियमित रेडिओ ऐकतात. वृत्तपत्र वाचतात. राजकारणाची सर्व माहिती ठेवतात. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ. नियमित व्यायाम असल्याने त्यांना कुठलाही आजार नाही. तरुणांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच अंगात प्राण असेपर्यंत मतदान करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com