शहराच्या आरोग्यापेक्षा रिक्त पदांच्या भरतीलाचं पसंती 

live
live

नाशिक- शहराचे आरोग्य सुस्थितित ठेवण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याची आवशक्‍यता असताना त्याकडे दुर्लक्ष करतं आज सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिकेतील रिक्त पदे भरण्याचाचं रेटा लावल्याने प्रशासनाला नेमके काय साधायचे असा प्रश्‍न मंत्र्यांसह उपस्थितांना पडल्याने अखेरीस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी आपण स्वता पाठपुरावा करू असे आश्‍वासन नामदार शिंदे यांना द्यावा लागले. 
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फैलावणाऱ्या स्वाईन फ्ल्यु आजाराने जुलै महिन्यातचं तोंड वर काढतं तब्बल 154 रुग्णांना कवेत घेतले तर दहा रुग्णांचा मृत्यु झाला. राज्यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयात भेट देवून स्वाईन फ्ल्युच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी सव्वा लाखांहून घरांना भेटी देणे, खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवणे आदी प्रकारचे दावे आरोग्यमंत्र्यांसमोर करण्यात आले

मिडीयाकडून सर्व प्रकारची माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. काही महिन्यांपुर्वी वैद्यकीय विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन महिलांना रिक्षातचं प्रसृती व्हावे लागले तर पोटाची शस्त्रक्रीया झालेल्या एका रुग्णाच्या पोटात कापसाचा बोळा आढळून आल्याची बाब निर्दशनास आणून दिली. चुकीच्या कामांवरून आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कान उपटले. शहरात सोनोग्राफी सेंटरवरील महिलांच्या वाढत्या गर्दीबाबत मात्र भाष्य करण्याचे टाळले. वैद्यकीय विभागाकडून स्वाईन फ्ल्युचे रुग्ण का वाढले यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी 54 वैद्यकीय पदांची भरती करण्याचाचं आग्रह अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याने शहराच्या आरोग्यापेक्षा रिक्त पदांच्या भरतीतचं अधिक रस असल्याचे दिसून आले.

महापौर रंजना भानसी यांच्यासह आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शासनाकडून वैद्यकीय व आरोग्य विभागासाठी सक्षम अधिकारी देण्याची मागणी केली. सध्याचे अधिकारी अकार्यक्षम असल्यावर थेट भाष्य केले. उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, सभागृह नेते सतीश सोनवणे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, भाजप गटनेते जगदीश पाटील यांच्यासह आरोग्य सहसंचालक डॉ.सतिश पवार, संचालक डॉ.अर्चना पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. 

नाशिक मध्ये "आपला दवाखाना' 
सर्वचं राजकीय पक्षांच्या दृष्टीने दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष राजकारणातील स्पर्धक वाटतं असल्याने या पक्षाला कोंडीत पकडण्याचे ऐनकेन प्रयत्न होत असताना आज आरोग्यमंत्री शिंदे यांनी राजधानी दिल्लीच्या मोहल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर महाराष्ट्रात "आपला दवाखाना' योजना सुरु करण्यात आल्याचे सांगितले. ठाणे शहरात आपला दवाखाना योजना राबविली जात आहे. आता शासनाच्या निधीतून दहा आपला दवाखाने शहरात निर्माण केले जाणार असून त्याचे नामकरण स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे नामकरण करण्यात आले आहे. एखाद्या रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यापर्यंत येता येत नसेल तर आपला दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णाच्या घरापर्यंत पोहोचून वैद्यकीय सेवा देण्याची सोय आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com