आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत भुषणला रौप्य पदक 

Nilesh joshi- bhushan deshmukh
Nilesh joshi- bhushan deshmukh

जळगाव ः उलानबतार (मंगोलिया) येथे झालेल्या एरोबिक जिम्नॅस्टिक्‍स आशियाई चषक स्पर्धेमध्ये भूषण देशमुखने ज्युनिअर- 2 म्हणजे 17 वर्षाखालील वयोगटात रौप्य पदक प्राप्त केले. भूषणच्या माध्यमातून खानदेशास पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीयस्तरावर जिम्नॅस्टिक्‍स या प्रकारात सहभागाची संधी मिळाली होती. 
मु. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलाचा खेळाडू भुषण देशमुख याने 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान उलानबतार (मंगोलिया) येथे झालेल्या एरोबिक जिम्नॅस्टिक्‍स आशियाई चषक स्पर्धेमध्ये खानदेशातून प्रथमच भूषण देशमुख याची भारतीय संघात खेळाडू म्हणून तर प्रा. निलेश जोशी यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावर निवड झाली होती. या स्पर्धेत भारतीय संघास 2 सुवर्ण, 4 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 9 पदके मिळाली. स्पर्धेत भारत, श्रीलंका, फिलिपाईन्स, मंगोलिया अशा एकूण नऊ संघांनी सहभाग नोंदविला होता. भुषण देशमुख हा चार वर्षांपासुन एकलव्य जिम्नॅस्टिक्‍स ऍकॅडमी येथे सराव करत असून, आतापर्यंत त्याने विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. गतवर्षी त्याची कलकत्ता (पश्‍चिम बंगाल) येथे झालेल्या अखिल भारतीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती. 
तसेच प्रा. निलेश जोशी यांना या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची संधी मिळाली होती. एकलव्य जिम्नॅस्टिक्‍स ऍकॅडमीद्वारे मागील चार वर्षांपासून प्रा. निलेश जोशी यांनी आजपर्यंत एकूण एक आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू, 16 राष्ट्रीय खेळाडू पैकी 5 पदकप्राप्त खेळाडू आणि 28 राज्यस्तरीय खेळाडू पैकी 14 पदकप्राप्त खेळाडू घडवले आहेत. शिवाय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा. निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाला चंदेरी झालर प्राप्त झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com