Loksabha 2019 : मोदींना जनता पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविणार! : मंत्री गुलाबराव पाटील

Loksabha 2019 : मोदींना जनता पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविणार! : मंत्री गुलाबराव पाटील

काही कठोर निर्णय घेऊन आपल्या देशाचे नाव जगभरात उंचावणारा पंतप्रधान निवडणे आवश्‍यक आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्या मूलभूत सुविधांचा विचार करणारा, देशपातळीवर कणखर नेतृत्व देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांनाच पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविण्याचा निर्णय शिवसेनेच्या वाघाने घेतला आहे. जनतेचीही साथ आहेच. त्यामुळेच जळगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार उन्मेष पाटील प्रचंड मताने विजयी होतील, असा विश्‍वास सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

प्रश्‍न : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास झाला आहे काय? 
मंत्री गुलाबराव पाटील : होय, निश्‍चितच अगदी रस्त्याचा विषय घ्या, देशात रस्त्याच्या कामाची मोठी प्रगती झाली आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याशिवाय देशात बदल होत नाही. पूर्वी रस्त्याची कामे फारशी झालेली नव्हती; परंतु मोदी सरकारच्या काळात रस्ते विकास झाल्यामुळे इतर क्षेत्रातही विकास झाला आहे. 

प्रश्‍न : केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातही विकास झाला? 
मंत्री पाटील : केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. शेळगाव बॅरेजला निधी उपलब्ध झाला आहे, घरकुल योजना साकारण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य योजनांचाही लाभ जिल्ह्याला मिळाला आहे. ग्रामीण व शहरी भागातही उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे. 

प्रश्‍न : खासदारांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात विकास झाला का? 
मंत्री पाटील : खासदार निधी केवळ पाच कोटी रुपये मिळतो, त्यातून फारशी कामे होत नाहीत; परंतु केंद्राच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांची रस्त्यासह विविध विकास कामे झाली आहेत. या शिवाय विमानतळाचे कामही झाले आहे. लवकरच कायमस्वरूपी प्रवासी वाहतूकही सुरू होणार आहे. 

प्रश्‍न : आगामी काळात विकासाचा "अजेंडा' काय? 
मंत्री पाटील : जळगाव मतदारसंघात पुन्हा युतीचाच खासदार निवडून येईल. उन्मेष पाटील हे उच्चशिक्षित आहेत, त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे संसदेत ते आपले व्यवस्थित मुद्दे मांडून विकासासाठी निधीही उपलब्ध करून आणतील, त्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळेल. 

प्रश्‍न : युतीला यश मिळेल काय? 
उत्तर : होय, निश्‍चितच यश मिळेल. गेल्या पाच वर्षांत केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला आहे. लोकसभेत गेल्या तीस वर्षांपासून युती आहे. आताही युतीचाच उमेदवार आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्तेही जोरदार काम करीत आहेत. शिवाय चाळीसगाव मतदारसंघात स्वत: उन्मेष पाटील आमदार आहेत, पारोळा मतदारसंघात चिमणराव पाटील यांचे वर्चस्व आहे. पाचोरा मतदारसंघात आमचे किशोर पाटील आहेत. "जळगाव ग्रामीण'मध्ये मी स्वत: आमदार आहे. जळगाव शहरात माजी आमदार सुरेशदादा जैन, तसेच आमदार सुरेश भोळे आहेत. अमळनेरमध्ये आमदार शिरीष चौधरींचाही पाठिंबा आहे. या शिवाय मोदी तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यावरही जनतेचा विश्‍वास आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार उन्मेष पाटील निश्‍चित विजयी होतील, याची खात्री आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com