महापौरपदी सिमा भोळे बिनविरोध; सेनेचा बहिष्कार 

live photo
live photo

जळगाव ः जळगाव शहर महापालिकेत महापौरपदी भाजपच्या सिमा सुरेश भोळे, तर उपमहापौर म्हणून अश्‍विन सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. महापौर निवड प्रक्रियेवर विरोधातील शिवसेनेने बहिष्कार टाकला असल्याने 56 विरूद्ध शुन्य असे बहुमत मिळाले. "एमआयएम'ने तटस्थ भुमिका ठेवली. 
जळगाव महापालिकेची मतदान प्रक्रिया गेल्या महिन्यात पार पडली होती. यात 75 पैकी 57 जागांवर विजय मिळवून भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता मिळविली होती. महिनाभरानंतर महापौर व उपमहापौर निवडीसाठी आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी आयुक्‍त चंद्रकांत डांगे उपस्थित होते. महापौर निवडीच्या प्रक्रियेत भाजपतर्फे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सिमा भोळे यांचा महापौर पदासाठी तर अश्‍विन सोनवणे यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल असल्याने त्यांची निवड निश्‍चित होती. आज महापालिका प्रशासकिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर महापौर निवडीसाठी विशेष सभा झाली. यात औपचारिक घोषणा करत सिमा भोळे यांची महापौरपदावर बिनविरोध निवड झाली. महापौर निवड प्रक्रियेवर शिवसेनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने सिमा भोळे यांची 56 विरूद्ध शुन्य अशी निवड झाली. तर एमआयएमने तटस्थ भुमिका घेतल्याने मतदान प्रक्रिया न होता भाजपच्या नगरसेवकांनी हात उंचावून पाठींबा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com