नगररचना'ला टाळे ठोकणाऱ्या सेना नगरसेवकावर गुन्हा 

ANANT JOSHI
ANANT JOSHI

जळगाव ः महापालिकेच्या नगररचना विभागातील गैरकारभाराविरोधात थेट पालिका इमारतीत पोहचून नगररचना विभागाला टाळे ठोकण्याचा प्रकार शिवसेना नगरसेवकाच्या चांगलाच अंगलट आला. सकाळी या नगरसेवकाने उत्साहात आंदोलन केले, मात्र दुपारनंतर आयुक्तांच्या आदेशाने त्यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. 

महापालिकेचा नगररचना विभागातील कामकाजाविषयी नेहमीच प्रश्‍न उपस्थित केला जातो. याबाबत आज शिवसेनेचे गटनेते अनंत ऊर्फ बंटी जोशी यांनी नगररचना विभागात जाऊन आंदोलन सुरु केले. नागरिकांच्या विविध बांधकाम परवानगीसाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासूनच्या प्रकरणांचा निपटारा होत नसल्याच्या कारणावरुन सकाळी सव्वा दहाच्या वाजेच्या सुमारास नगररचना विभागास टाळे ठोकून जोशी तेथेच खुर्चीवर ठाण मांडून बसले. आयुक्त आश्‍वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन करून टाळा खोलणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. मनपा प्रशासनाने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तसेच उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी जोशी यांची समजूत काढल्यानंतर सव्वा अकरा वाजता शिपायाकडे चाबी देऊन ते निघून गेले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com