ज्येष्ठांच्या आरोग्यासोबत मनोरंजनाचा आनंद!

ज्येष्ठांच्या आरोग्यासोबत मनोरंजनाचा आनंद!

जळगाव ः आयुष्याच्या कातरवेळी कोणीही सोबत नसते. वृद्धाश्रमात राहून वेळ घालवायचा अन्‌ विरंगुळा कसा करायचा, हाच प्रश्‍न असतो. यात आरोग्याकडेही लक्ष देण्याचे दूरच. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही संस्था पुढे येतात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच मनोरंजनात्मक उपक्रम राबवीत असतात. 
ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून काही संस्था पुढाकार घेऊन ज्येष्ठांना मदतीचा हात देतात. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर बाबींविषयी मोफत सल्ला, ओळखपत्रे, आरोग्य शिबिर घेऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन, समुपदेशन आदींसह सोयी-सुविधा दिल्या जातात. यात शहरातून अनेक संस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करीत आहेत. यामध्ये युवाशक्‍ती फाउंडेशन, तुळजाई बहुद्देशीय यांसारख्या संस्था वर्षभर उपक्रम राबवीत असतात. 

ज्येष्ठ नागरिक मंचची स्थापना 
युवाशक्‍ती फाउंडेशन सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही कार्य सुरू आहे. काव्यरत्नावली चौकात सायंकाळी जमणाऱ्या ज्येष्ठांना एकत्रित आणून ज्येष्ठ नागरिक मंचची स्थापना केली आहे. यात 69 सदस्य असून, या मंचअंतर्गत ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. शिवाय, गणेशवाडी व काव्यरत्नावली चौकात वाचनालय सुरू केले. इतकेच नव्हे; तर ज्येष्ठांचे मनोरंजन म्हणून सव्वादोनशे ज्येष्ठ नागरिकांना "नटसम्राट' हा चित्रपटही दाखविला आहे. 

आरोग्य शिबिरातून तपासणी 
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने युवाशक्‍तीतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात येते. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या शिबिरातून 125 जणांची तपासणी करण्यात आली. यात काही आजार असल्यास त्यांच्यावर कमी पैशांत उपचार करून देण्याची सोयी-सुविधाही उपलब्ध केली जाते. डोळ्यांचे शस्रक्रिया असल्यास त्यांना कांताई नेत्रालयापर्यंत पोचवून अल्प दरात शस्रक्रिया करून दिली जाते. याव्यतिरिक्‍त मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांची तपासणी आणि दिवाळीत आजी- आजोबांसोबत फराळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात. 
 
तुळजाई संस्था आरोग्याबाबत अग्रेसर! 
तुळजाई बहुद्दशीय संस्था गेल्या आठ- नऊ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात समाजोपयोगी कामासाठी नेहमी कार्यरत आहे. यातच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी काळजी घेत आहे. यात प्रामुख्याने मातोश्री वृद्धाश्रमासह विविध ठिकाणी आजी- बाबांसाठी नेहमी आरोग्याविषयी उपक्रम राबवीत असते. आतापर्यंत सुमारे तीन हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याविषयी वेळोवेळी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com