वॉटर पार्क' विकास आराखड्याचे काम सुरू 

live photo
live photo

जळगाव : महापालिकेची गिरणा नदीपात्राजवळ सुमारे आठ एकर जागा आहे. तेथे यापूर्वी "रॉ वॉटर स्टेशन' व जलशुद्धीकरण केंद्र होते. मात्र, हे केंद्र बंद पडले असून, या ठिकाणी वॉटर पार्कसह पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी पर्यटन विकास मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार उद्यापासून (ता.20) या जागेचे मोजमाप करून विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. महिन्याभरात प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. 

शहरात वाघूर धरणापूर्वी गिरणा पंपिंग स्टेशन येथून पाणीपुरवठा केला जात होता. ही जागा सावखेडा शिवारात गिरणा नदी पात्रालगत असून, पाण्याचे स्रोत अत्यंत जवळच आहे. यामुळे बंद पडलेले "रॉ वॉटर स्टेशन' व जलशुद्धीकरण केंद्र, सावखेडा येथील संपूर्ण जागेत भंगार अवस्थेत पडलेली पंपिंग स्टेशनची जुनी मशिनरी आहे. या जुन्या मशिनरीचा लिलाव करून आता या जागेवर पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी पुढाकार घेऊन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन हा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शवीत त्वरित विकास आराखडा तयार करून द्या, या पर्यटनस्थळाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानुसार आज स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, शहर अभियंता सुनील भोळे, पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके व विकास आराखडा तयार करून देणारे वास्तुविशारद किशोर पाटील यांनी या वाघूर पंपिंगची पाहणी केली. 

विकास आराखडा लवकरच 
महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत "वॉटर पार्क' व पर्यटनस्थळ तयार करण्यासाठी वास्तुविशारद म्हणून किशोर पाटील यांची नेमणूक केली आहे. विकास आराखडा तयार करण्याचे काम उद्यापासून (ता.20) सुरू होणार असून, महिन्याभरात विकास आराखडा, थ्रीडी प्रोजेक्‍ट, तसेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जिल्हाधिकारी शासनाकडे पाठविणार आहे. सुमारे 15 कोटींत हा प्रकल्प उभा राहणार आहे. 

अद्ययावत "वॉटर पार्क' तयार होणार 
गिरणा नदीपात्राजवळील पाणी उचल (रॉ वॉटर) स्टेशनची जागा 4 एकर तर जवळच असलेल्या चार ते पाच एकरमध्ये असलेले जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी अद्यावत असे "वॉटर पार्क' तयार केले जाणार आहे. यात वॉटर डायव्हिंग, वॉटर फॉल, रेन डान्सिंग, म्युझिक वॉटर असे विविध प्रकार तसेच नदीपात्रात बंधारा टाकून तेथे बोटिंग, विश्रामगृह, चेंजिंग रूम आदी सुविधा केली जाणार आहे. 


जुने साहित्याचे विक्री होणार 
गिरणा पंपिंग स्टेशनवरील पाणीपुरवठ्याची जुनी मशिनरी भंगार व जीर्ण अवस्थेत आहे. तसेच विश्रामगृहासह बांधकामे पडीक झाली आहे. महापालिकेची ही कोट्यवधींची मालमत्ता धूळखात पडलेली आहे. ही जुनी मशिनरी भंगारात विक्री करून पडित बांधकामाच्या जागेवर "वॉटर पार्क' धोकादायक झाडे वगळता कोणतेही झाडे न तोडता हा प्रकल्प उभा राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com